आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kick 2 Shooting Has Started With Starring Ravi Teja

सलमानच्या 'किक'ला मिळालेल्या यशानंतर साउथमध्ये सुरु झाले 'किक 2'चे शूटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून 'किक'च्या हिंदी पोस्टरवर सलमान खान, तेलगू व्हर्जनच्या पोस्टरवर रवि तेजा आणि इलियाना डिक्रूज)
मुंबई: 20 ऑगस्टला साउथच्या 'किक 2'चे शूटिंग सुरु झाले आहे. 2009मध्ये रिलीज झालेल्या साउथ सिनेमाच्या 'किक'च्या सीक्वेलविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या सिनेमाचा रिमेक मागील महिन्यात बॉलिवूडमध्ये रिलीज झाला. त्यामध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती. साजिद नाडियाडवालाने या तेलगू सिनेमाचे अधिकार खरेदी करून हिंदी रिमेक तयार केला होता.
हिंदीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तेलगू दिग्दर्शक सुरेंद्र रेड्डीने या सिनेमाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमात साउथ सुपरस्टार रवि तेजा मुख्य भूमिका वठवत आहे. सिनेमाची निर्मिती एनटीआर आर्ट्स बॅनर अंतर्गत केली जात आहे.
दिग्दर्शक सुरेंद्र रेड्डीनुसार, सिनेमाच्या सीक्वलचा पहिल्या भागाशी काही संबंध नाहीये. मात्र हा एक अ‍ॅक्शन सिनेमा असणार असे त्यांने सांगितले. तेलगूमध्ये 'किक'चा सीक्वेल तयार झाल्यानंतर साजिद काय योजना करणार हे बघणे रंजक ठरणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'किक'च्या हिंदी व्हर्जनने किती कमाई केली आणि हिंदीमध्ये 'किक'चा सीक्वल व्हावा अशी सलमानची
इच्छा...