आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Kick' Opening Weekend Collections Near Rs 80 Crore

'किक'ची घौडदौड, 3 दिवसांत केला 80 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'किक'च्या एका सीनमध्ये सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस
मुंबई: सलमान खान अभिनीत 'किक'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे जाणवते. कारण सिनेमाने पहिल्या दिवशी ज्या गतीने कमाई केली, ती अजूनही तशीच आहे. रिपोटर्सनुसार, 'किक'ने 27 जुलैपर्यंत जवळपास 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता सिनेमाच्या कमाईचे ताजे आकडेसुध्दा समोर आले आहेत.
कोईमोई वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, 'किक'ने फस्ट वीकेंडमध्ये 83 ते 85 कोटींचा व्यवसाय केला आहे. सिनेमाच्या कमाईकडे बघून असे जाणवते, की सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. मंगळवारी (29 जुलै) सुटीचा दिवस असल्याने सिनेमाच्या व्यवसायाचा आकडा उंचवण्याची शक्यता आहे. ईदच्या सुटीचा सिनेमाला चांगलाच फायदा होऊ शकतो.
सिनेमा पंडितांच्या मते, सिनेमा मंगळवारी (29 जुलै) ईदच्या दिवशी 30 कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता. मात्र, एवढे सगळे असूनही सलमानचा 'किक' आमिरच्या 'धूम 3'चा रेकॉर्ड मोडित काढू शकला नाही. 'धूम 3'ने फक्त तीन दिवसांत 100 कोटींचा व्यवसाय केला होता. 'धूम 3' हा सर्वाधिक वेगाने कमाई करणा-या सिनेमांच्या यादीत सामील झाला.