मुंबई - सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'किक' या सिनेमातील 'जुम्मे की रात' हे गाणे शुक्रवारी रात्री लाँच करण्यात आले. या लाँचिंग इवेंटमध्ये सिनेमात मेन लीड साकारणारे सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, संगीतकार हिमेश रेशमिया आणि कोरिओग्राफर अहमद खान सहभागी झाले होते. 'जुम्मे की रात..' हे शब्द असलेले गाणे सलमानने जुम्मेच्या दिवशी लाँच केले.
यावेळी सलमानने हे गाणे
अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत झालेल्या 'जुम्मा चुम्मा दे दे' या गाण्याशी साधर्म्य साधणारे नसल्याचे स्पष्ट केले. या दोन्ही गाण्यांमध्ये काहीही साम्य नसल्याचे त्याने सांगितले. 'जुम्मा चुम्मा दे दे' हे गाणे 'हम' या सिनेमातील असून अमिताभ आणि किमी काटकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. सलमानने म्हटले, या प्रश्नाची मला विचारणा होईल, हे मला ठाऊक होते. मी स्वतः 'जुम्मा चुम्मा...' या गाण्याचा मोठा चाहता आहे. जेव्हाही हे गाणं टीव्हीवर येतं तेव्हा मी आवर्जुन ते बघत असतो. मात्र माझे गाणे या गाण्यापेक्षा खूप वेगळे आहे. हे गाणे अहमद खान यांनी कोरिओग्राफ केले आहे. यातील डान्स माझ्यासाठी खूप कठीण होता.
'जुम्मे की रात' हे गाणे शब्बीर अहमद आणि कुमार यांनी लिहिले आहे. मिका सिंग आणि पलक मुचाल यांनी गाण्याला स्वरसाज चढवला आहे. तर हिमेश रेशमिया याने हे गाणे कंपोज केले आहे.
28 मे रोजी मुंबईतील महबूब स्टुडिओत हे गाणे शूट करण्यात आले होते. 'किक'मध्ये सलमान आणि जॅकलिन यांच्यासह रणदीप हुड्डा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 25 जुलै रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'जुम्मे की रात...' या गाण्याच्या लाँचिंग इवेंटची खास छायाचित्रे...