आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'किक\'ला मिळाले बंपर ओपनिंग, पहिल्या दिवशी केली 26 कोटींपेक्षा जास्त कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('किक' सिनेमाचे पोस्टर)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'किक' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धडाक्यात सुरुवात झाली आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 26 कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केला आहे. देशभरात 4400 स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज झाला. सलमानच्या मागील सिनेमांच्या तुलनेत किकला चांगले ओपनिंग मिळाले आहे.
ओपनिंग डेला 'किक' बघायला थिएटरबाहेर चांगली गर्दी बघायला मिळाली. 85 ते 90 टक्के ओपनिंग सिनेमाला मिळाले. सिनेमाचे मुंबईतील जास्तीत जास्त शो हाऊसफूल होते. शिवाय दिल्ली, यूपी, पंजाब, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, बिहारमध्येही सिनेमाला चांगले ओपनिंग मिळाले. येथील सकाळपासून ते उशीरा रात्रीपर्यंतचे सर्व शो जवळपास हाऊसफूल होते. अद्याप सिनेमाच्या कमाईचे अधिकृत आकडे सांगण्यात आलेले नाहीत. मात्र पहिल्या दिवशी या सिनेमाने ओव्हरऑल 30 कोटींच्या घरात बिझनेस केल्याची शक्यता आहे.
समीक्षकांच्या मते हा विकेंड सिनेमा चांगला व्यवसाय करु शकतो. सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. हा सिनेमा निर्माता दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमानच्या यावर्षी रिलीज झालेल्या जय हो या सिनेमाच्या तुलनेत या सिनेमाचा बिझनेस जास्त चांगला झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सलमानच्या मागील चार सिनेमांनी पहिल्या दिवशी किती कमाई केली होती...