आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांच्या गराड्यात लाँच होणार 'किक'चा ट्रेलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या चाहत्यांची त्याच्या आगामी चित्रपटांविषयीची असलेली उत्सुकता संपुष्टात आली आहे. 15 जून रोजी या वर्षातील सलमानच्या मोठ्या चित्रपटांपैकी एका चित्रपटाचा ट्रेलर चाहते पाहू शकणार आहेत. हा 'किक' चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन साजिद नाडियाडवालाने केले आहे. 'जय हो'चा ट्रेलर सलमानने चाहत्यांच्या गराड्यात लाँच केला होता. आता याची पुनरावृत्ती तो 'किक'द्वारे करताना दिसतो आहे. यामुळे मुंबईमधील बांद्रा भागातील 'गॅटी-गॅलेक्सी' चित्रपटगृहात चित्रपटाचा ट्रेलर एकाचवेळी सात पडद्यावर पाहता येईल.
याप्रसंगी चित्रपटाचे संपूर्ण युनिट उपस्थित राहणार आहे. सलमान चित्रपटाच्या लाँचदरम्यान आपल्या चाहत्यांशी आणि माध्यमांशी चर्चा करणार आहे. 'किक'मध्ये सलमानबरोबरच रणदीप हुडा, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा समावेश आहे.