('किक' सिनेमाचे पोस्टर)
सलमान खानचा आगामी 'किक' हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. जाणकारांच्या मते, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा गल्ला जमवू शकतो. तर दिग्दर्शक साजिद नाडियाडवालांच्या मते, हा त्यांचा पहिला टेक्निकल सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाला त्यांच्या डेब्यू सिनेमा समजावा.
2 तास 20 मिनिटे लांबीच्या या सिनेमात सलमान खानचे अनेक शानदार स्टंट्स त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. तरण आदर्श यांच्या मते, ''या सिनेमाला पहिल्याच दिवशी उत्तम ओपनिंग मिळू शकते. ज्याप्रकारे या सिनेमाचे प्रमोशन सुरु आहे, त्यानुसार हा सिनेमा यावर्षातील बेस्ट ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरु शकतो.'' आता सलमान, ईद आणि हॉलिवूड स्टाइलचे कॉम्बिनेशन या सिनेमासाठी किती फायदेशीर ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निर्माता आणि आता दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावू पाहणारे साजिद नाडियाडवाला यांचे म्हणणे आहे, ''मी आजवर अनेक नवोदित दिग्दर्शकांना संधी दिली. सर्वांनीच थोड्या फार चुका केल्या. मात्र मला चुका करण्याची संधी नाहीये. मला अनुभवी दिग्दर्शक म्हणून संबोधले जात आहे. याचा अर्थ माझा माझ्या सिनेमावर विश्वास नाही, असे नाही. सिनेमा हिट होईल. मात्र ट्रेड पंडितांना या सिनेमाकडून जास्त अपेक्षा आहेत. सध्या मी बॉक्स ऑफिसच्या गणितांविषयी विचार करतोय.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सिनेमाशी निगडीत 10 छायाचित्रे...