(रणवीर सिंह आणि अली जाफर)
मुंबई: रणवीर सिंह, अली जफर,
परिणीती चोप्रा आणि गोविंदा यांच्या 'किल दिल' या आगामीचे टायटल साँग लाँच करण्यात आले आहे. गाण्यात कोणताही डान्स किंवा सीन्स नाहीये. जास्तित-जास्त शॉट्स ट्रेलरमधून रिपीट घेण्यात आले आहे.
यशराज बॅनरखाली तयार झालेल्या 'किल दिल'चे टायटल साँग गुरुवारी (25 सप्टेंबर) लाँच करण्यात आले आहे. गाण्यात रणवीर सिंह, अली जफर आणि गोविंदा दिसत आहेत. हे टॅडिशनल साँग ट्रॅकपेक्षा जास्त सिनेमाचे प्रोमो ट्रॅक वाटत आहे. त्यामध्ये तिन्ही नायकांचे फाइट सीन्स आणि एक-दोन डान्स स्टेप्स दिसल्या आहेत.
गाण्यात परिणीती चोप्रा दिसत नाही. या गाण्याला सिनेमाच्या तिन्ही नायकांवर चित्रीत करण्यात आले आहे. 'किल दिल' कलरफुल सिग्नेचर शेड्समध्ये रंगलेल्या तीन नायकांच्या चेह-यांपासून 'किल दिल'च्या टायटल साँगची सुरुवात होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातून घेण्यात आलेली काही निवडक छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइड्सवर पाहा गाण्याचा व्हिडिओ...