आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: युवराजला सोडून 3 मुलांचा वडील असलेल्या या NRIसोबत किमने थाटले होते गुपचुप लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - युवराजसिंग, किम शर्मा, अली पुंजानी, किम आणि अली पुंजानी एकत्र)

बॉलिवूड आणि लाइमलाइटपासून दूर गेलेली अभिनेत्री किम शर्मा 35 वर्षांची (21 जानेवारी 1980) झाली आहे. एकेकाळी क्रिकेटपटूसोबतच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत राहणा-या किमचे बॉलिवूड करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. बॉलिवूडमध्ये पदरी पडत असलेल्या अपयशाला बघून किम केन्यास्थित बिझनेसमनसोबत लग्न करुन सिनेसृष्टीला रामराम ठोकला. बिझनेसमन अली पुंजानीसोबत किम विवाहबद्ध झाली असून कार्पोरेट आयुष्य व्यतित करत आहे.
चर्चेत राहिले युवराजसिंगसोबतचे अफेअर
क्रिकेटपटू युवराजसिंग सोबतच्या प्रेमसंबंधांमुळे किम शर्मा चर्चेत आली होती. जवळजवळ चार वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2007 मध्ये दोघांचे प्रेम आटले आणि ते विभक्त झाले. युवराजच्या आईला किम सून म्हणून पसंत नव्हती. त्यामुळे हे नाते संपुष्टात आले. युवीने आईचे म्हणणे ऐकून किमच्या आयुष्यातून काढता पाय घेतला होता. युवराजनंतर किम स्पेनिश तरुणासोबत डेट करत होती. दोघांनी लग्नाचा निर्णयसुद्धा घेतला होता. मात्र हे नातेसुद्धा फार काळ टिकले नाही.
केन्यास्थित बिझनेस टायकूनसोबत गुपचुप थाटले लग्न
2010मध्ये अगदी खासगी समारंभात किमने अली पुंजानी नावाच्या बिझनेस टायकूनसोबत लग्न केले. अली केन्या येथील प्रसिद्ध व्यावसायिक असून त्यांचे पहिले लग्न झाले होते. किमचे पहिले तर अलीचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या पत्नीपासून अली यांना तीन मुले आहेत. लग्नानंतर आता किम नैरोबी (केन्या) येथे स्थायिक झाली आहे.
किम शर्माचे फिल्मी करिअर
मुंबईत ऑडिशन दिल्यानंतर किमची क्लोजअप टूथपेस्टच्या जाहिरातीसाठी निवड झाली होती. त्यानंतर तिला आदित्य चोप्रांच्या मोहब्बतें या सिनेमाद्वारे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. मात्र या सिनेमाच्या यशाचा किमला काही फायदा झाला नाही. तिचे जवळपास सर्व सिनेमे फ्लॉप ठरले.
किमचे प्रमुख सिनेमे
मोहब्बतें (2000), तुमसे अच्छा कौन है (2002), कहता है दिल बार बार (2002), फिदा (2004), टॉम, डिक अँड हॅरी (2006), जिंदगी रॉक्स (2006), डॅडी कूल (2209)।
किमप्रमाणेच बी टाऊनमधील काही अभिनेत्रींनीसुद्धा गुपचुप लग्न थाटले होते. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी..