आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही बाजीदेखील जिंकला बाजीगर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाकारांची लोकप्रियता आता फक्त चित्रपटाची संख्या किंवा ते हिट होण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर नेहमी बातम्यात झळकत राहणेदेखील त्यांची लोकप्रियता ठरवते. एका मीडिया रिसर्च कंपनीने केलेल्या तीन महिन्यांच्या रिसर्चमध्ये शाहरुख खानचे नाव क्रमांक एकवर आले आहे.
पूर्वी कलाकार एक हिट चित्रपट देऊन दोन-चार महिने पडद्यावरून गायब राहत होते. तरी त्यांच्या लोकप्रियतेवर विशेष फरक पडत नव्हता, पण आता ते दिवस राहिलेले नाही. आता त्यांना पडद्याबरोबरच नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहावे लागते. मग तो विषय वादग्रस्त असला तरी चालतो. चर्चेतही तीन-चार महिन्यांचा विसर पडला तरीही प्रेक्षक त्यांना विसरायला लागलात. एका वरिष्ठ चित्रपट निर्मात्यांच्या मते, आजकालचे प्रेक्षक शॉर्ट टर्म मेमोरी लॉसचे शिकार झाले आहेत.
2012च्या सुरुवातीच्या तीन महिन्यात कोणता कलाकार सर्वात जास्त चर्चेत राहिला याची माहिती एका मीडिया रिसर्च कंपनीने मिळवली आहे. कंपनीच्या रिसर्च टीमने सुरुवातीच्या तीन महिन्याच्या वृत्तपत्रांचा आढावा घेतला. यामध्ये शाहरुख खानचे नाव समोर आले आहे. या बातम्यात मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमच्या हाणामारीच्या बातम्या नाहीत. तर आपल्या एका को-स्टारसोबत लिंकअप, तिच्यासोबत एका पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन, स्वत:ची क्रिकेट टीम आणि शेवटी फराहा खानचा पती शिरीष कुंदरसोबत झालेल्या हाणामारी मुळे तो यात विजयी झाला आहे.
जाणकारांच्या मते, फक्त चर्चेत राहणेच पुरेसे नाही तर नकारात्मक प्रसिद्धीने कलाकाराचे नुकसानदेखील होते. ज्या उत्पादनांची तो कलाकार जाहिरात करतो त्यावरदेखील प्रभाव पडतो. शाहरुखच्या प्रतिमेवर त्याच्या क्रिकेट संघाच्या विजयाने चांगला प्रभाव पडला, पण मुंबईच्या स्टेडियममध्ये झालेल्या हाणामारीमुळे त्याची प्रतिमा मलीन झाली. महानायक अमिताभ बच्चनने शस्त्रक्रियेमुळे चर्चेत राहून शाहरुख खानला टक्कर दिली. त्यांच्या नातीच्या बातम्यांची देखील यात भर पडली. नंतर गुजरातचे ब्रँड अँम्बेसेडर आणि अग्निपथच्या रिमेकमध्ये हृतिकसोबत तुलनेच्या बातम्याचाही यात समावेश आहे. अमिताभ बच्चननंतर करिना कपूर तिसर्‍या क्रमांकावर आहे. ती आपल्या ‘एक मैं और एक तू’ आणि ‘एजंट विनोद’मुळे चर्चेत राहिली. यात सैफ अली खानसोबत साखरपुड्याच्या बातम्या ही आहेत. करिना कपूरनंतर सलमान खान, प्रियंका चोप्रा, विद्या बालन, कॅटरिना कैफ, सैफ अली खान, बिपाशा बसू आणि रणबीर कपूर इत्यादी नावाचा समावेश आहे.