आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kingfisher Calendar Girls Making Waves In Bollywood

PIX : बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या या अभिनेत्री एकेकाळी होत्या 'किंगफिशर कॅलेंडर गर्ल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(2006 मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर अभिनेत्री दीपिका पदुकोण)
बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी प्रत्येकजण एका संधीची वाट बघत असतो. स्टार किड्ससाठी बॉलिवूडमध्ये प्रवेश घेणे थोडे सोपे असते. तर हाय प्रोफाईल लाइफसाठी प्रसिद्ध भारतीय बिझनेसमॅन विजय माल्यांचे किंगफिशर कॅलेंडर नवोदित मॉडेल्ससाठी एक चांगला प्लॅटफॉर्म ठरले आहे. किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनलेल्या अनेक मॉडेल्सनी आज बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अलीकडेच इंदोरच्या कोमल कालरा पागारानी या तरुणीने मिसेस एशिया इंटरनॅशनलचा खिताब आपल्या नावी केला आहे. हा खिताब मिळवल्यानंतर कोमलकडे किंगफिशर कॅलेंडरची नव्हे तर गोल्डन कॅलेंडरसाठी काम करण्याची ऑफर आली आहे. मात्र तिने ही संधी नाकारली आहे.
बोल्डसीनमुळे दिला नकार - विजय माल्या यांच्या आयुष्यावर गोल्डन कॅलेंडर नावाने एक सिनेमा तयार होत आहे. यामध्ये कोमलला विजय माल्यांचा मुलगा सिद्धार्थच्या गर्लफ्रेंडच्या भूमिका ऑफर करण्यात आली होती. आता माल्यांचा कॅलेंडर असो, किंवा त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा, साहजिकच त्यामध्ये बोल्ड सीन्सचा तडका हा असणारच आहे. त्यामुळेच कोमलने ही भूमिका नाकारली. तिच्या मते, ती विवाहित आहे आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी ती आपले तत्व सोडणार नाही.
2006 मध्ये दीपिका बनली होती कॅलेंडर गर्ल
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण 2006 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली होती. दीपिकासह अनेक नवोदित याला एक उत्तम प्लॅटफॉर्म समजतात. पूर्वी ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी नवोदितांकडे सौंदर्य स्पर्धा असायच्या. मात्र आता अनेक मार्ग निर्माण झाले आहेत.
काय आहे किंगफिशर कॅलेंडर
किंगफिशर कॅलेंडर (स्विमसूट) विजय माल्यांच्या यूबी ग्रुपच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येतं. भारतात हे मॉडेल्स आणि अभिनेत्रींसाठी एक उत्तम लाँचिंग प्लॅटफॉर्म समजले जाते. याची सुरुवात 2003 मध्ये झाली होती. प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर सुरुवातीपासून याच्याशी जुळला आहे. 2010 मध्ये या कॅलेंडरसाठी 'मॉडेल हंट' स्पर्धा सुरु करण्यात आली. दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, थायलँड, फ्रान्स, गोवा या ठिकाणी याचे शूटिंग केले जाते.
पुढे वाचा... बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या या अभिनेत्री होत्या किंगफिशर कॅलेंडर गर्ल्स...