आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kingfisher Model Poonam Pandy Visit At Divyamarathi.com , Mumbai Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व काही चाहत्यांसाठी; बिनधास्त पूनमचे 'बोल्ड' उत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-5 विजेत्या केकेआर संघासाठी 'न्यूड' पोज देऊन पूनम पांडे हिने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. आता पूनम हिने पाचव्यांदा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथ आनंदसाठी काहीतरी 'खास' करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, अद्याप याचे काही प्लानिंग केले नसल्याचेही तिने सांगितले.
सुप्रसिद्ध किंगफिशर मॉडेल पूनम पांडे हिने शुक्रवारी दै. 'दिव्य मराठी डॉट कॉम' मुंबई कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तेथूनच तिने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोयडा, भोपाळ, अहमदाबाद, चंदीगड आणि औरंगाबाद येथील पत्रकारांशी संवाद साधला. वाचकांनी पाठविलेल्या प्रश्नांनाही तिने यावेळी उत्तरे दिली.
एरवी फोटोंमध्ये 'न्यूड' दिसणारी पूनम आज परिपूर्ण कपड्यात दिसल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. 'मी केवळ शाहरूख खानसाठी 'न्यूड' होत नाही तर माझ्या फॅन्ससाठीही 'न्यूड' होते. चाहत्यांना आवडते तेच मी दाखवते' असे पूनम म्हणाली. विशेष म्हणजे अशा प्रकारचे काम करत असताना कोणतीही भीती अथवा खंत वाटत नसल्याचे तिने सांगितले.
पूनम म्हणाली, 'मला जे आवडते ते मी करते. हे जर कोणाला चुकीचे वाटत असेल तर मला त्याची पर्वा नाही.' इंटरनेटवरील माझे न्यूड फोटो, व्हिडिओ खरे असल्याचेही तिने यावेळी सांगितले.
पूनम झाली न्यूड, कोलकाता संघाला विजयाची भेट! (फोटोफिचर)
पूनम पांडे आता झाली सेक्स गुरु
या बिकनी छायाचित्रांमधून पूनम देणार अभिनेत्रींना धडा