आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर कुमारांच्या वडिलोपार्जित घराची कोट्यवधीमध्ये होणार विक्री, पाहा घराचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किशोर कुमार यांच्या मध्य प्रदेशातील खंडवास्थित घराचे एक छायाचित्र)
खंडवा : दिवंगत गायक-अभिनेते किशोर कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची लवकरच विक्री होणार आहे. मंगळवारी किशोर कुमार यांचा धाकटा मुलगा सुमित आणि अनूप कुमार यांचा मुलगा अर्जुन खंडवा येथील बांबे बाजार स्थित आपल्या वडिलोपार्जित घरी पोहोचले होते. दोन्ही भावांनी लीगल अॅडव्हाइजर आणि प्रॉपर्टी ब्रोकर यांच्यासह घराची पाहणी केली.
घराची पाहणी केल्यानंतर कुमार भावांनी प्रॉपर्टी ब्रोकरसह विक्रीसंबंधी एक तास चर्चा केली. किशोर कुमार यांचे हे वडिलोपार्जित घर आता अनूप कुमार यांचा मुलगा अर्जुन कुमारच्या नावावर आहे. 7600 चौरस. फुटात पसरलेल्या या घराची आणि दुकानाची किंमत जवळपास (सरकारी दरानुसार) बारा कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. याचा बाजार भाव 15 ते 16 कोटींच्या घरात आहे. कुमार भावंडं खंडवामध्ये पोहोचल्यानंतर घराची विक्री सहा कोटींमध्ये झाल्याची अफवा पसरली होती. नंतर मीडियाशी बोलताना अर्जुन यांनी घराची विक्री झाल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले, की अद्याप घराची विक्री झालेली नाही. सुमित हे घर बघण्यासाठी येथे आला होता.
प्रॉपर्टी ब्रोकरसोबत झालेल्या बातचितविषयी त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. सुमित यांनी सांगितले, ही माझ्या बाबांची शेवटची आठवण आहे. हे बघून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा किशोर कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची काही निवडक छायाचित्रे...