आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'खैरलांजी...\' वादाच्या भोवऱ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक दीपक बलराज वीज प्रथमच मराठी चित्रपटाच खलनायकाची भूमिका करीत असून याच चित्रपटात त्यांचीच खऱ्या जीवनातील पत्नी किशोरी शहाणे मुख्य नायिका आहे. अर्थात हा सिनेमा म्हणजेच 'खैरलांजीच्या माथ्यावर'. आता खुद्द खैरलांजी प्रकरणातील अत्याचार ग्रस्त कुटुंबातील भैयालाल भोतमांगे यांनी आक्षेप घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडू पाहतो आहे. खैरलांजी प्रकरणातील अत्याचार ग्रस्त कुटुंबातील भैयालाल यांनी हा चित्रपट पाहून तो आपल्याला पसंत असून आवडला आहे, असा अभिप्राय प्रथम दिल्याचा निर्मात्याकडून दावा होत असला तरी, भैय्यालाल यांनी मात्र आक्षेप नोंदविला आहे. आपण कधीही मद्यप्राशन आणि मांसाहार करीत नाही. मात्र या चित्रपटात आपण मद्यप्राशन करताना दाखविल्याने व्यथित आहोत, असे त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. मात्र हा चित्रपट करताना तो केवळ माहितीपट होता कामा नये याची ही दक्षता घेणे जरुरीचे आहे असे दिग्दर्शकाने म्हटले आहे.
विशेष म्हणजे प्रदर्शनापुर्वीच हा चित्रपट राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी पाहून त्याचे कौतुकही केले आहे. भारत सरकारने पद्मश्री बहाल केलेल्या कल्पना सरोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर राजू मेश्राम या चित्रपटाचे लेखक पटकथा संवाद लेखक आहेत.
पुढे वाचा, खैरलांजी ही प्रवृत्ती आहे जिथे कायदा पोहोचत नाही...