आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी हृतिक रोशनसह रोमान्स करणा-या बारबरा मोरीने थाटले गुपचुप लग्न!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('काइट्स'च्या एका सीनमध्ये हृतिक रोशनसह बारबरा मोरी)
मुंबई - 'काइट्स' या सिनेमात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसह झळकलेल्या बारबरा मोरीने लग्न केले असल्याचा दावा मॅक्सिकोतील एका प्रसिद्ध मीडिया हाउसने केला आहे. बातमी आहे, की 36 वर्षीय बारबराने हॉलिवूड अभिनेता जॉन मायकल इकरसह गुपचुप लग्न केले. 16 ऑगस्ट रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले. या लग्नात बारबरा आणि जॉनचे जवळचे नातेवाईकच उपस्थित असल्याचे सांगितले जाते. अद्याप बारबरा किंवा जॉनने याविषयी मौन बाळगले आहे.
काही दिवसांपूर्वीच बारबराला जॉनसह साखरपुड्याची अंगठी खरेदी करताना बघितले गेले होते.
यापूर्वी बारबराचे मॅक्सिकन अभिनेता आणि निर्माता सर्गियो मेयर्ससह अफेअर होते. या दोघांचा एक 16 वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव सर्गिटो आहे.
कोण आहे बारबरा मोरी...
बारबराचा जन्म 2 फेब्रुवारी 1978 रोजी मोंटेवीडियो, उरुग्वेमध्ये झाला. ती एक मॅक्सिकन अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका आहे. बारबरा केवळ तीन वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. तिचे बालपण मॅक्सिको आणि उरुग्वेमध्ये गेले. वयाच्या बाराव्या वर्षी ती मॅक्सिकोमध्ये स्थायिक झाली होती.
वयाच्या 14 व्या मॉडेलिंगला सुरुवात...
बारबराने वयाच्या केवळ 14व्या वर्षापासून मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. फॅशन डिझायनर मार्कोस टोलेडोसाठी तिने पहिल्यांदा मॉडेलिंग केले होते. तर 1997 मध्ये स्मश टीव्हीच्या 'मिराडा डे मुजेरा' या मालिकेत तिने पहिल्यांदा अभिनय केला होता. बारबराची ही मालिका बरीच गाजली होती.
2004 मध्ये मिळाला मोठा ब्रेक...
2004 मध्ये बारबराला मोठी संधी मिळाली. स्मश टीव्हीवर तिची प्रमुख भूमिका असलेली 'रुबी' मालिका बरीच गाजली होती. या मालिकेमुळे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. असे म्हटले जाते, की रुबी त्यावर्षातील सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका होता. त्यानंतर 2005 मध्ये रिलीज झालेला तिचा La mujer de mi hermano हा पहिला सिनेमासुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता.
सर्गियोसोबतची भेट...
करिअरच्या सुरुवातीच्या काळात बारबराची भेट मॅक्सिकन अभिनेता सर्गियोसह झाली. हळूहळू या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. 1998 मध्ये बारबराने सर्गियोच्या मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव सर्गिटो असून तो आता 16 वर्षांचा आहे. सर्गिटो सध्या अभिनय जगतात करिअर करण्यासाठी संघर्ष करतोय. बारबरा आणि सर्गियो यांनी लग्न केलेले नाही.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री आणि हृतिकसोबतच अफेअर...
2010 मध्ये बारबराने अनुराग बसू दिग्दर्शिक 'काइट्स' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. या सिनेमात अभिनेता हृतिक रोशन तिच्यासह झळकला होता. राकेश रोशन या सिनेमाचे निर्माते होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. मात्र त्यावेळी हृतिकसोबतच्या अफेअरमुळे बारबरा बरीच चर्चेत आली होती. असे म्हटले जाते, की बारबरासोबतच्या अफेअरमुळेच हृतिक आणि सुझान यांच्यात दुरावा निर्माण झाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बारबराची निवडक छायाचित्रे...