आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Alleged Love Affair Of Bollywood Stars

अभिषेकची नव्हे, एकेकाळी या तरुणाची दीवानी होती ऐश्वर्या, जाणून घ्या Celebsचे First Love

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः ऐश्वर्या राय आणि राजीव मुलचंदानी)
जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे पहिले प्रेम अनमोल असते. पहिले प्रेम तो कदापी विसरू शकत नाही. पडद्यावर आपले मनोरंजन करणा-या अनेक कलाकारांनीसुद्धा पहिल्या प्रेमाची अनुभूती घेतली आहे. मात्र त्याची ते फारशी चर्चा करीत नाही. सेलिब्रिटींचे आयुष्य कायम वादग्रस्त असते. काही सेलेब्सची अगदी पहिली, दुसरी, तिसरी इत्यादी इत्यादी प्रेम प्रकरणे झालेली असतात. आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगत आहोत...
राजीवसोबत ऐश्वर्या राय करायची डेटिंग...
माजी जगतसुंदरीचे अगणिक चाहते आहेत. लग्न आणि आई झाल्यानंतरसुद्धा ऐश्वर्याची फॉलोईंग मुळीच कमी झालेली नाही. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण झाल्यानंतर ऐश्वर्याचे नाव सुपरस्टार सलमान खानसोबत जोडले गेले होते. दोघांचे प्रेमप्रकरण बरेच चर्चेत राहिले होते. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबरॉयसोबत जोडले गेले. मात्र ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ऐश्वर्याच्या चाहत्यांना सलमानच तिचे पहिले प्रेम होते, असे वाटत असले. मात्र तसे नाहीये. मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या राजीव मूलचंदानी याच्यासोबत ऐश्वर्याचे पहिले अफेअर होते. परंतु, ऐश्वर्या यशाच्या शिखरावर गेल्यावर दोघांमध्ये ताणतणाव निर्माण झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्टसह काही निवडक बॉलिवूड स्टार्सच्या पहिल्या प्रेमाविषयी...