आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीपकुमार होते फळविक्रेते तर सोनमने केली होती वेट्रेसची नोकरी, जाणून घ्या स्टार्सचा भूतकाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड स्टार्सच्या संदर्भातील छोट्यातील छोटी गोष्ट मोठी बातमी होत असते. हे सेलिब्रिटी काय करतात त्यांच्या खासगी आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अलीकडेच चित्रपटसृष्टीची जिवंत दंतकथा म्हणून ख्याती असलेले दिलीपकुमार यांची 'सब्सटन्स अँड शॅडो' ही बायोग्राफी लाँच करण्यात आली. उदय तारा नायर यांनी लिहिलेल्या या बायोग्राफीमध्ये दिलीप साहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या पुस्तकात दिलीप कुमार यांचा जन्म, त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश, तेथील इतक्या वर्षांचा प्रवास ते आत्तापर्यंतच्या जीवनाची माहिती आहे.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी दिलीप साहेबच नव्हे तर येथील कलाकार नेमके काय करायचे हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. प्रसिद्धीझोतात येण्यापूर्वी हे कलाकार लहान-मोठी कामे करायचे. स्वबळावर या कलाकारांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यापैकीच एक आहेत दिलीपकुमार. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी दिलीप साहेब कँटीनचे संचालक होते. इतकेच नाही घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुंबईला आलेल्या दिलीप कुमार यांनी सुरुवातीच्या काळात फळे विकण्याचे काम केले. बराच संघर्ष केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यशोशिखर गाठणारे बी टाऊनचे सेलिब्रिटी फिल्मी करिअरला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्या क्षेत्रात काम करत होते, ते सांगत आहोत.

पुढे वाचा, सोनमला का करावे लागले वेट्रेसचे काम...