आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Salman Khan And Raj Kundra's Properties

सलमान खान V/S शिल्पा शेट्टीचे पती, जाणून घ्या कुणाकडे किती प्रॉपर्टी आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : सलमान खान आणि राज कुंद्रा)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या आणि सलमान खानच्या कमाईची तुलना केली होती. सलमानच्या चाहत्यांनी यावरून राजला चांगलाच फैलावर घेतले होते.
राज कुंद्रा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, की ‘मी पैज लावू शकतो, की सलमानचेही माझ्याएव्हढे उत्पन्न नसेले... किंबहुना माझ्या जवळपासही नसेल... मी फिल्म इंडस्ट्रीत केवळ माझ्या बायकोमुळे आहे... ती या इंडस्ट्रीचा भाग आहे म्हणून केवळ मी सिनेमा बनवतोय.’
या वक्तव्यानंतर राज कुंद्रावर सलमानच्या चाहत्यांनी बरीच टीका केली. त्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये राज कुंद्रा म्हणाला होते, की ‘मित्रांनो, मी सगळ्याच कामांचा सन्मान करतो. तुमच्याकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग असतात. मुलाखतीत मी जे काही म्हटले ते केवळ एक बिझनेसमन म्हणून... माझा उद्देश कुणालाही दुखावण्याचा नव्हता’.
जाणून घ्या राज कुंद्रा आणि सलमान खानच्या संपत्ती आणि बिझनेसविषयी...
सलमान खान - बॉलिवूडचा दबंग खान सिनेमांव्यतिरिक्त क्लोथिंग लाइन, जाहिराती आणि अन्य व्यवसायांमधून कमाई करतो. त्याच्या कमाईचे सर्वात मोठे माध्यम हे सिनेमांमधून मिळणारा प्रॉफिट शेअर आहे. सेलिब्रिटींच्या संपत्तीचा सर्वे करणा-या एका वेबसाइटच्या मते, सलमानची एकुण संपत्ती ही 1200 कोटींच्या घरात आहे.
राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध बिझनेसमन यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात नेपाळ आणि दुबईत पशमिना शॉलच्या ऑनलाइन विक्रीने केली होती. या व्यवसायातून त्यांनी वर्षभरातच 160 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर त्यांनी हि-यांचे इंटरनॅशनल ट्रेडिंगचे काम सुरु केले. या व्यवसायातही त्यांना यश मिळाले. अलीकडेच त्यांनी ज्वेलरी बिझनेस सुरु केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या राज कुंद्रा आणि सलमान खानच्या घर, गाड्या आणि वार्षिक उत्पन्नाविषयी..