आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Salman Khan Brother In Law Aayush Sharma

आज आहे सलमानच्या बहिणीचे लग्न, जाणून घ्या नवरदेवाचे फॅमिली बॅकग्राऊंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत आयुष शर्मा)
मुंबई- आज (18 नोव्हेंबर) सलमान खानची बहीण अर्पिताचे लग्न आहे. हा लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये पार पडणार आहे. लग्नात बॉलिवूडसह इतर दिग्गजसुध्दा सहभागी होणार आहेत. हे तर सर्वांना ठाऊक आहे, की आर्पिताचे लग्न आयुष शर्मासोबत होत आहे. मात्र, आयुष काय करतो? त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? त्याची अर्पितासोबत कशी ओळख झाली? या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला अर्पिताच्या होणा-या पतीविषयी सांगत आहोत. सोबतच, त्याच्याशी निगडीत काही गोष्टीविषयीसुध्दा सांगत आहोत.
कोण आहे आयुष शर्मा?
अर्पिताचा होणारा नवरा आयुषचा जन्म दिल्लीमध्ये झाला. त्याचे वय जवळपास 28 वर्षे आहे. त्याने दिल्लीच्या पब्लिक स्कुलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तसे पाहता आयुषचे कुटुंबीय हिमाचल प्रदेशच्या मंडी शहराचे रहिवासी आहेत.
वडील आणि आजोबा राजकारणातील दिग्गज आहेत.
आयुष शर्मा दिल्लीत राहतो. त्याचे वडील अनिल शर्मा राजकारणात सक्रिय आहेत आणि ते हिमाचल प्रदेशचे मंत्री आहेत. एवढेच नव्हे आयुषचे आजोबा सुखराम शर्मा राजकारणात प्रसिध्द आहेत. सुखराम पाचवेळा विधानसभा निवडणूक आणि तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकलेले आहेत. ते काँग्रेस सरकार असताना केंद्रीय मंत्रीदेखील होते. सोबतच, हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून ते काँग्रेसचे सदस्यसुध्दा होते.
बिझनेस आणि अभिनयात
आयुष दिल्लीमध्ये आपल्या कुटुंबीयांचा बिझनेस सांभाळतो. मात्र, अभिनयात करिअर करण्यासाठी तो सध्या मुंबईमध्ये स्थायिक झाला आहे. असे सांगितले जाते, की त्याने स्वत: सांगितले होते जर तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये यश मिळवू शकला नाही तर पुन्हा दिल्लीला जाऊन बिझनेस सांभाळणार आहे. सलमान आयुषला बॉलिवूडमध्ये स्थापित करण्यासाठी मदत करणार आहे.
अर्पिताशी ओळख
अर्पिता आणि आयुष गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची भेट एका पार्टीत झाली होती. त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. आयुषने अर्पितासोबतचा एक फोटो पोस्ट करून लिहिले होते, 'जेव्हा अर्पितासोबत असतो तेव्हा एक क्षणसुध्दा व्यर्थ नसतो.' दोघांच्या नात्याविषयी सलमानला माहित झाल्यानंतर त्याने आपल्या फार्म हाऊसवर आयुषच्या कुटुंबीयांना भेटवण्यास बोलावले आणि लग्न ठरवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयुष-अर्पिताचे Pics...