आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हम आपके हैं कौन’: 20 वर्षांनंतर अशी दिसते 'सलमानची वहिनी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री रेणुका शहाणे, तेव्हा आणि आता)
5 ऑगस्ट 1994 रोजी हम आपके है कौन हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. अलीकडेच या सिनेमाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सुपरस्टार सलमान खान आणि निर्माता-दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सेलिब्रेशन केले. फॅमिली ड्रामा असलेल्या या सिनेमाने त्यावेळी यशाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. शंभर कोटींची कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला होता.
राजश्री बॅनरच्या या सिनेमामुळे सलमान खान आणि माधुरी दीक्षितचे करिअर यशोशिखरावर पोहोचले होते. आज सलमान आणि माधुरी सुपरस्टार्स असून आपापल्या करिअर आणि आयुष्यात खूप पुढे निघाले आहेत.
भारतीय मुल्य, परंपरा, रोमान्स आणि संस्कारांचे मिश्रण असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तब्बल 20 वर्षांनी सलमान आणि सूरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. राजश्री बॅनरच्या प्रेम रतन धन पायो या सिनेमात सलमान मेन लीडमध्ये झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे.
चला जाणून घेऊया, सिनेमाची स्टारकास्ट आता म्हणजे 20 वर्षांनंतर काय करत आहेत...
रेणुका शहाणे - या सिनेमानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे जणू घराघरांतील फेव्हरेट सून बनली होती. तिने या सिनेमात सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या सिनेमानंतर रेणुकाने काही बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. रेणुका आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने दिग्दर्शित केलेल्या रिटा या सिनेमाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. तिचे आणखी काही मराठी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. रेणुका आता 47 वर्षांची झाली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सिनेमातील इतर स्टारकास्ट आता कुठे सक्रिय आहे...