आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशीर्वाद, मन्नत आणि जलसा, जाणून घ्या स्टार्सनी कुणाकडून खरेदी केले होते बंगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पहिले छायाचित्रात बिग बी आपल्या पेटसह घराच्या गार्डन परिसरात, दूसरे छायाचित्र त्यांच्या घराचे आहे.)
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा 'आशीर्वाद' बंगला अखेर विकला गेला आहे. बिझनेसमन शशी किरण शेट्टी यांनी हा बंगला खरेदी केला आहे. तब्बल 90 कोटींमध्ये हा बंगला विकला गेल्याची चर्चा आहे.
राजेश खन्ना यांनी 1970 मध्ये हा बंगला खरेदी केला होता. त्यांनी या बंगल्याचे नाव 'आशीर्वाद' असे ठेवले होते. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी हा बंगला खूप लकी ठरला होता. येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक 15 हिट सिनेमे दिले होते. हा एक रेकॉर्ड होता. त्यामुळे त्यांना इंडस्ट्रीतील पहिले सुपरस्टार म्हटले जाते.
राजेश खन्ना यांच्यापासून ते बिग बी, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा या स्टार्सचेसुद्धा आलीशान बंगले खूप प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांनी त्यांचे हे बंगले कुणापासून खरेदी केले, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्यांच्या या बंगल्यांची किंमत आज कोटींच्या घरात आहे.
बिग बींनी सिप्पींकडून खरेदी केला होता 'जलसा'...
बिग बी आपल्या संपूर्ण कुटुंबासह 'जलसा' या बंगल्यात राहतात. हे घर त्यांनी सत्तरच्या दशकात दिग्दर्शक एनसी सिप्पी यांच्याकडून खरेदी केला होता. यापूर्वी बच्चन कुटुंब 'प्रतिक्षा' या बंगल्यात वास्तव्याला होते. आज कोटींच्या घरात किंमत असलेला 'जलसा' हा बंगला बिग बींनी किती रुपयांत खरेदी केला होता, हे उघड झालेले नाही.
पुढे वाचा, शाहरुख खानपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत कोणत्या सेलिब्रिटीने कुणाकडून खरेदी केले आपले स्वप्नातील घर...