आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना नव्हे विश्वनाथ पाटेकर आहे खरे नाव, सिनेसृष्टीत पाय रोवण्यासाठी करावा लागला 8 वर्षे संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता नाना पाटेकर)
भारतीय सिनेसृष्टीत प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांनी नुकतीच वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात नानांचा जन्म झाला. नाना हा एक उत्तम अभिनेते आहेत, याविषयी कुणाच्या मनात संदेह असू नये. त्याचबरोब बिनधास्त आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्यांची प्रसिद्धी आहे.
खासगी आयुष्य...
नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे. नाना यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.
बॉलिवूडमधील पदार्पणः
नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये 'गमन' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या सिनेमामधून ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरले. सिनेसृष्टीत पाय रोवण्यासाठी नानांना तब्बल आठ वर्षे संघर्ष करावा लागला. याकाळात ते मिळतील ती भूमिका करत असते. याकाळात त्यांनी गिद्ध, भालू, शीला या सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
'अंकुश'द्वारे मिळाली खरी ओळखः
नाना पाटेकर यांना यश मिळवून देण्यात निर्माता-दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या सिनेमांचा मोठा वाटा आहे. नानांना पहिली मोठी संधी मिळाली ती 1986 मध्ये आलेल्या 'अंकुश' या सिनेमात. या सिनेमात नानांनी बेरोजगार तरुणाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1987 मध्ये एन. चंद्रां यांच्याच 'प्रतिघात'मध्ये त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली., 1989 मध्ये रिलीज झालेला 'परिंदा' हा सिनेमा नाना पाटेकर यांच्या सिने करिअरमधील हिट सिनेमांमध्ये गणला जातो.
1992 मध्ये रिलीज झालेला 'तिरंगा' हा मुख्य अभिनेत्याच्या रुपात नाना पाटेकर यांच्या सिनेकरिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा आहे. 1996मध्ये रिलीज झालेल्या 'खामोशी' या सिनेमात त्यांनी मनीषा कोईरालाच्या मुकबधिर वडिलांची आव्हानात्मक भूमिका उत्कृष्टरित्या साकारली. ही भूमिका कोणत्याही अभिनेत्यासाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हती.
केवळ गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून नानांकडे बघितले जाऊ लागले होते. मात्र 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'वेलकम' या सिनेमातून त्यांनी विनोदी भूमिकासुद्धा ते ताकदीने पेलू शकतात हे सिद्ध केले. नाना यांनी आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये जवळजवळ 60 हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
पुरस्कारांवर उमटवली मोहोरः
नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय तीनदा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 'परिंदा', 'क्रांतीवीर' आणि 'अग्निसाक्षी' या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 2013 मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला.
मराठीतही उत्कृष्ट कामेः
सिंहासन (1979), भालू (1980), रघू मैना (1982), सावित्री (1983), गड जेजुरी जेजुरी (1985), माफिचा साक्षीदार (1986), पक पक पकाक (2005), देऊळ (2011), डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हीरो (2014)
कार्टुन सीरिजला आवाजः
नाना पाटेकर यांनी दर रविवारी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'जंगल बूक' या प्रसिद्ध कार्टुन सीरिजसाठी आपला आवाज दिला होता. या कार्टुनमधील शेरखान या व्हिलन कॅरेक्टरसाठी त्यांनी व्हॉईस ओव्हर दिला होता.
दिग्दर्शक म्हणून पदार्पणः
माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया स्टारर 'प्रहार द फायन अॅटक' या सिनेमाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातसुद्धा आपला हात आजमावला होता.
सिनेमांसाठी पार्श्वगायनः
नानांनी यशवंत (1997), वजूद (1998) आणि आंच (2003) या सिनेमांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले होते.
मनीषा कोईरालासोबत अफेअरची चर्चाः
नाना पाटेकर यांचे नाव मनीषा कोईरालासोबत जुळले होते. नव्वदच्या दशकात 'अग्निसाक्षी' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचे सूत जुळल्याची चर्चा होती. या काळात दोघांनी बराच काळ एकत्र घालवला असल्याचे म्हटले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नाना पाटेकर यांची खास छायाचित्रे...