आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅजेडी किंगचे मूळे नाव आहे मो. यूसुफ खान, तुम्हाला ठाऊक आहेत का इतर स्टार्सचे Real Names

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार आज आपला 92वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र त्यांना फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने सध्या ते लीलावती रुग्णालयात दाखल आहेत.
दिलीप कुमार यांचा सामावेश नाव बदलून फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणा-या स्टार्समध्ये होतो. दिलीप साहेबांचे मूळ नाव मो. यूसुफ खान आहे.
दिलीप कुमार यांनी 'ज्वार भट' (1944) या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र या सिनेमातून त्यांना खास ओळख मिळाली नाही. त्यानंतर 1947मध्ये त्यांनी 'जुगनू'मध्ये काम केले. हा सिनेमा यशस्वी ठरला आणि लोकांनी त्यांना पसंत केले. या सिनेमानंतर दिलीप साहेबांनी 'शहीद', 'अंदाज', 'दाग', 'दीदार', 'मधुमती', 'देवदास', 'मुसाफिर', 'नया दौर', 'आन', 'आजाद'सारखे अनेक हिट सिनेमे दिले. प्रत्येक यशस्वी सिनेमानंतर त्यांचे नाव शिखरावर पोहोचत गेले.
92 वर्षीय दिलीप कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी आपली ऑटोबायोग्राफी प्रदर्शित केली. त्यामध्ये त्यांनी चाहत्यांना आपल्या आयुष्यातील गुपित रहस्य आणि आतापर्यंत ठाऊक नसलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत.
तसे पाहता नाव बदलून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणा-या स्टार्सची मोठी यादी आहे. आज या रिपोर्टमध्ये आम्ही स्टार्सचे मूळ नाव सांगत आहोत. ज्यांनी कुणाच्या म्हणण्यावरून तर कुणी यशस्वी होण्यासाठी नाव बदलले...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच काही बॉलिवूड स्टार्सविषयी ज्यांनी आपले नाव बदलून फिल्म इंडस्ट्रीत नाव कमवले...