(फोटो- अर्पिता खान आणि आयुष शर्मा)
सलमान खानची बहीण अर्पिताचे 18 नोव्हेंबर रोजी लग्न झाले. आता 21 नोव्हेंबर रोजी लग्नाच्या रिसेप्शनची तयारी केली जात आहे. लग्न आणि रिसेप्शनच्या चर्चा चालू असतानाच नवदाम्पत्य आयुष आणि अर्पिता हनीमूनचे प्लानिंग करत आहेत.
बातम्यांनुसार, लग्नापूर्वी एका मुलाखतीत आयुषने खुलासा केला होता, की तो अर्पितासोबत हनीमूनला कुठे जाणार आहे. आयुषने सांगितले, अर्पितासोबत ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि बोरा-बोरा आयलँडला जाण्याचे प्लानिंग आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडच्या सुंदर लोकेशनविषयी खूप लोकांना ठाऊक असेलच, परंतु बोरा-बोरा आयलँड नवीन हनीमून डेस्टिनेशन बनत आहे. फ्रान्सच्या या आयलँड सुंदर बीच आणि लग्जरी रिसॉर्ट्ससाठी ओळखले जाते.
28 वर्षांचा आयुष आणि अर्पिताचे लग्न 18 नोव्हेंबर रोजी हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये झाले. मात्र हनीमूनविषयी नक्की काय प्लानिंग असणार हे लवकरच समोर येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लग्नापूर्वीची अर्पिता आणि आयुषची छायाचित्रे...