आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

79 वर्षांचे झाले धर्मेंद्र, परंतु साजरा करणार नाही वाढदिवस, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- धर्मेंद्र)
मुंबई- बॉलिवूडमध्ये हीमॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र आज 79 वर्षांचे झाले आहेत. परंतु ते आपला बर्थडे सेलिब्रेट करण्याऐवजी 'सेकंड हँड हसबँड' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. समीप कांडच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या सिनेमाचे शूटिंग चंदीगढमध्ये चालू आहे. धर्मेंद्र यांनी 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक दिपशिखासोबत रोमँटिक सिक्वेन्स शूट केले आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्याशी संपर्क साधणे कठिण होते. कारण ते आपला फोन बंद करून ठेवतात.
धरम पाजींना आपला वाढदिवस साजरा करणे आवडत नाही. ते वयस्कर झालेत म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या आईची आठवण येत आहे. त्यांना खूप अस्वस्थ वाटत आहे.
धर्मेंद्र यांच्या मते, 'मला जन्म देणारीच या जगात नाहीये, तर मी कशाला वाढदिवस साजरा करू.' सांगितले जाते, की धर्मेंद्र आपल्यासोबत वडिलांनी दिलेले एक पत्र ठेवतात. रोज सकाळी त्याचे दर्शन घेतात. ते म्हणतात, 'मी खूप भावूक आहे. मी माझ्या आई-वडिलांशिवाय वाढदिवस साजरा करू शकत नाही. मी त्यांना प्रार्थना करतो, की मला एक चांगला व्यक्ती होण्यास मदत करा. मला इतकी शक्ती द्या, की मी इतरांना आनंदी ठेऊ शकले.'
बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र यांना 56 वर्षे झाली आहेत. सिनेमांप्रति आपूलकी व्यक्त करत धर्मेंद्र सांगतात, 'ला नेहमी वाटते, की मी एक नवोदित अभिनेता आहे. ज्याला एक मेल मिळताच तो मुंबईला आला आणि अभिनेता बनला. मी कॅमे-याला फेस करण्यासाठी नेही उत्साही असतो. मात्र, चांगली पटकथा पाहूनच मी काम करतो. मी अभिनेता बनून इंडस्ट्रीमध्ये दिर्घकाळ काम करण्याचे माझे स्वप्न होते.'
अभिनेता बनण्याच्या स्वप्नावर धर्मेंद्र सांगतात, 'मी एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि मला अभिनेता होण्याचे स्वप्न होते. मला स्वत:ला एका पोस्टरवर पाहण्याची इच्छा होती. आज तुनिशिया आणि नायजीरियामधूनसुध्दा मला चाहते बोलवतात.'
बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र यांना सहा दशक पूर्ण होत आहेत. परंतु आजसुध्दा कामाच्या बाबतीत त्यांच्यात नवोदित अभिनेत्यांप्रमाणे उत्साह आहे. आजसुध्दा त्यांचे शरीर एखाद्या रॉकस्टारपेक्षा कमी नाहीये. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते रोज योगा आणि प्राणायम करतात.