आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Why Tiger Not Eat Ice Cream And Chocolate A Year

टायगरने एक वर्षापासून खाल्ले नाही आइस्क्रीम-चॉकलेट, जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अलीकडेच, आलेल्या आपल्या 'हीरोपंती'ने तरुणाईमध्ये लोकप्रियता प्राप्त करणा-या अभिनेता टायगर श्रॉफच्या बॉडीची तुलना सलमान आणि ऋतिकसोबत होत होती.
सिनेमाच्या प्रमोशनमध्ये टायगरने जोरदार आपल्या बॉडीचा आणि डान्सचा प्रचार केला. विविध टीव्ही मालिकांच्या सेटवर सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान टायगरने आपल्या जिम्नास्टीकचा चांगला वापर केला. सोबतच, आपल्या स्टंटने लोकांचे बॉडीकडे लक्ष वेधून घेतले.
टायगर श्रॉफचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे. 2 मार्च 1990मध्ये जन्मलेला टायगर मार्शल आर्ट्समध्ये कुशल आहे. त्याने मजबूत बॉडी करण्यासाठी घाम गाळला आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत टायगर श्रॉफसंबंधित काही रंजक गोष्टी...
डायट
टायगर पॅलियो डायटचे पालन करतो. हे एक लो कार्ब डायट आहे. मासे, चिकन, हिरव्या भाज्या आणि ड्राय फ्रुट्सचा त्याच्या डायटमध्ये सामावेश असतो. गेल्या एक वर्षापासून टायगरने चॉकलेट आणि आइसस्क्रीम खाल्लेली नाहीये.
आउटफिट्स
कॅज्युअल टी-शर्टव्यतिरिक्त टायगर पेस्टल रंगाचे कॉटन शर्ट्स परिधान करतो. हातात अनेक बँड्स घालतो.
अ‍ॅब्स
सहा वर्षांपासून कडक मेहनतीने टागरने सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवले आहेत. आपल्या लीन लूकला मेन्टन केले जेणेकरून अ‍ॅब्स परफेक्ट राहतील. टायगरची फिटनेस रेझिममध्ये रनिंग, कार्डियो वॅस्क्युलर ट्रेनिंग, डान्सिंग, मार्शल आर्ट्स आणि जिम्नास्टिकसह अनेक प्रकार सामील आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंगसह त्याने लोअल बॉडीसाठी खूप घाम गाळला.
नॉस्टेल्जिया
टायगरचा सिनेमा बघण्यासाठी 45पासून 58 वर्षांपर्यंतच्या वर्गातील लोक सामील होते. या वर्गातील लोक सहसा मसाला सिनेमांकडे पाठ फिरवतात. परंतु जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असल्याकारणाने टायगरला त्याचा फायदा झाला.
टायगर श्रॉफचा पदार्पणाचा 'हीरोपंती' हिट होण्यामागे सिनेमाची कहानी, संगीत, प्रमोशनाव्यतिरिक्त टायगरचे आयुष्य, व्यक्तीमत्व आणि फिटनेससंबंधित अनेक गोष्टींचे मोठे योगदान आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा टायगर श्रॉफची काही खास छायाचित्रे...