मुंबई: सुपरस्टार जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ काही दिवसांपूर्वी बराच चर्चेत आला होता. त्याने डान्स आणि स्टंटने सर्वांचे मन जिंकले. कदाचित त्यामुळेच त्याला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला आहे. त्याच्या 'हीरोपंती'ने 50 कोटींपेक्षा जास्त कमाई करून हिट सिनेमांच्या यादीत नाव सामील केले आहे. मात्र भावाच्या कमाईनंतर आणि हिट झाल्यानंतर बहीण आता चर्चेत आली आहे. जॅकी यांची मुलगी कृष्णा श्रॉफ आपल्या ब्राझीलिअन प्रियकरासह अफेअरच्या बातम्यांनी चर्चेत आली आहे.
बातम्यांनुसार, कृष्णाचा ब्राझीलिअन प्रियकर स्पेन्सर जॉनसन अलीकडेच टायगल श्रॉफच्या 'हीरोपंती'च्या सक्सेस पार्टीमध्ये दिसला होता. जॅकी यांनीसुध्दा मुलीच्या नात्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. कृष्णा काही दिवसांपासून जॉनसनला डेट करत आहे. तिने अलीकडेच जॉनसनसह आपले एक छायाचित्र सोशल साइट्सवर पोस्ट केले आहे. त्यामध्ये ती त्याला किस करताना दिसत आहे. हे छायाचित्र सोसल साइटवर व्हायरल झाले आहे. कृष्णाच्या
फेसबुक प्रोफाईलचा फोटोदेखील जॉनसनसह आहे.
कृष्णा आणि जॉनसन यांनी यापूर्वीसुध्दा एकमेकांसोबतची छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्ट केलेली आहेत. एका सुत्राने सांगितले, 'जॉनसन फुटबॉल ट्रेनर असून KOOH स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजर आहे. तो मुंबईमध्ये राहत आहे.'
सुत्राने असेही सांगितले, 'जॉनसन आणि कृष्णाला अनेकदा सोबत बघितल्या गेले आहे. मात्र या जोडीने आपल्या नात्याचा माध्यमांसमोर खुलासा केलेला नाहीये. कृष्णाच्या आई-वडिलांनासुध्दा या नात्याविषयी काहीच अडचण नाहीये.' एका जवळच्या सुत्राने सांगितले, 'टायगरने असेही म्हणाला, 'माझी बहीण आनंदी आहे तर मीसुध्दा आनंदी आहे.'
पुढील स्लाइड्सवर पाहा कृष्णाची पर्सनल आणि जॉनसनसह छायाचित्रे...