आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Unforgettable\'च्या म्यूझिक लाँचिंगमध्ये स्टार्सची मांदियाळी, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील सुपरस्टार इकबाल खान 'अनफॉगेटबल' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अर्शद युसूफ पठाणच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या सिनेमाच्या म्यूझिक लाँचिंगचा कार्यक्रम मुंबईमध्ये नोव्होटेलमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी बी-टाऊनचे अनेक सेलेब्स उपस्थित होते.
म्यूझिक लाँचिंग कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स अरबाज खान, सोहेल खान, जावेद जाफरी, आशुतोष गोवारिकर, विनोदवीर कृष्णा, करिश्मा शाह, आश्मित पटेल, जॉनी लिव्हर, रवि बहलसह अनेक स्टार्स उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व स्टार्सने धमाल-मस्ती केली. सोहेल यावेळी डेनिम लूकमध्ये दिसला. अरबाज सूट परिधान करून आला होता. जॉनी लिव्हर साध्या लूकमध्ये दिसले.
सिनेमाची मुख्य भूमिका साकारत असलेल्या इकबाल खानने 'तुम्हारी पाखी' या टीव्ही मालिकेमधून आपली ओळख निर्माण केली आहे. सिनेमात त्याच्यासोबत अलका वर्माला कास्ट करण्यात आले आहे. तिनेही 'सीआयडी' या टीव्ही मालिकेमधून ओळख बनवली आहे. सिनेमात इकबालच्या भूमिकेचे नाव आनंद असून अलकाच्या पात्राचे नाव तारा आहे. हा सिनेमा 13 जून 2014 रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा म्यूझिक लाँचिंग कार्यक्रमात कोण-कोणते स्टार्स पोहोचले होते...