(फाइल फोटोः वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत कृष्णा)
मुंबईः जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरनंतर आता त्यांची लेक कृष्णानेसुद्धा
आपल्या करिअरची निवड केली आहे. भाऊ टायगरप्रमाणेच कृष्णानेसुद्धा बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भावाप्रमाणे कॅमे-यासमोर न राहता तिने पडद्यामागे काम करण्याचे ठरवले आहे. कृष्णाला दिग्दर्शिका म्हणून नावारुपास यायचे आहे. अलीकडेच तिने तृतीयपंथियांच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री तयार केली असून त्याचे चित्रिकरणसुद्धा स्वतः केले आहे. 'ब्लॅक शीप' हे तिच्या डॉक्युमेंट्रीचे नाव आहे.
मुलीच्या या कामाचा श्रॉफ कुटुंबाकडून कोणताही गवगवा करण्यात आला नाहीये. कृष्णा अतिशय हुशार असून, ती शैक्षणिक अथवा फाईन आर्टसारख्या कुठल्याही क्षेत्रात चमकू शकते, अशा शब्दांत श्रॉफ कुटुंबियांच्या निकटवर्तीयाने तिचे कौतुक केले. याविषयी कृष्णाची आई आएशा श्रॉफ यांनी म्हटले, ''आमच्या मुलीने अलीकडेच या डॉक्युमेंट्रीचे शूटिंग पूर्ण केले आहे. या वृत्तपटात तिने तृतीयंपंथीय लोकांच्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांवर प्रकाशझोत टाकला आहे." आपल्या मुलीचा सार्थ अभिमान असल्याचे आएशा यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जॅकी-आएशा यांची लाडकी लेक कृष्णा श्रॉफची खास छायाचित्रे...