आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंग सोडून जॅकी श्रॉफच्या मुलाची हिरोईन बनली ही तरुणी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ 'हीरोपंती' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. टायगर या सिनेमामुळे चर्चेत तर आलाच परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? त्याची को-स्टारसुध्दा बरीच प्रसिध्द होत आहे. 'हीरोपंती'मध्ये त्याच्यासोबत किर्ती सेननला कास्ट करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये तिचा हा पहिला सिनेमा असला तरी तिने अनेकदा कॅमे-याला फेस केले आहे.
किर्तीने तेलगू सिनेमांमधून फिल्मी करिअरची सुरूवात केली आहे. बॉलिवूडमध्ये तिचा हा पहिला सिनेमा आहे. टायगरसोबतच्या तुलनेविषयी किर्ती म्हणते, 'जॅकी श्रॉफ यांच्यासारख्या सुपरस्टारचा मुलगा होऊनदेखील टायगर खूप साधा आणि सरळ आहे. त्याच्यासोबत सेटवर मी नवीन असल्याची मला कधीच जाणीव झाली नाही. माझ्यासोबत टायगरचा हा पदार्पणाचा सिनेमा आहे.'
दिल्लीमध्ये जन्मलेल्या किर्तीचे वडील सीए आहेत. आई फिजिक्सची प्राध्यापिका आहे. किर्ती स्वत: एक इंजीनियर आहे. परंतु अभिनयाच्या छंदाने तिला इथपर्यंत ओढून आणले. तिने इंजीनियरिंग सोडून सिनेमांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. किर्ती मुळ दिल्लीची रहिवाशी आहे. 'हीरोपंती'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त किर्तीच्या सांगण्यानुसार, तिच्या प्रत्येक निर्णयात कुटुंबीयांनी तिची साथ दिली. जेव्हा कामानिमित्त तिचे वडील काही दिवसांसाठी मुंबईमध्ये आले तेव्हा तीसुध्दा त्यांच्यासोबत आली होती. त्यानंतर तिने सिनेमांमध्ये काम करण्याचा निश्चय केला.
किर्तीने आपल्या करिअरमधील पहिल्या तेलगू सिनेमात काम केले तेव्हाच 'हीरोपंती'चा दिग्दर्शक शब्बीर खानने तिला फोन करून ऑडिशनसाठी बोलावले होते. काही दिवसांनंतर तिला या सिनेमासाठी निवडण्यात आले. आपल्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाविषयी किर्ती सांगते, की 'हीरोपंती'मध्ये तिच्या पात्राचे नाव डिम्पी आहे. तसेच, टायगर सिनेमात अ‍ॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा अभिनेत्री किर्ती सेननची काही निवडक छायाचित्रे...