(एकता कपूर आणि किर्ती सेनन)
मुंबई: चेतन भगतच्या '
हाफ गर्लफ्रेंड' कादंबरीचे बुधवारी (1 ऑक्टोबर) एका इव्हेंटमध्ये लाँचिंग करण्यात आले. या इव्हेंटमध्ये कादंबरीचा लेखक चेतन भगतसोबत दिग्दर्शक मोहित सूरी, एकता सूरी आणि किर्ती सेननसुध्दा दिसली. मोहित सूरी या कादंबरीवर सिनेमा तयार करणार असून एकता निर्मित करणार आहे.
या इव्हेंटमध्ये किर्तीची उपस्थितीने एक गोष्ट स्पष्ट केली, की कादंबरीवर तयार होणा-या सिनेमात ती नायिका असणार आहे. बातम्यांनुसार, तो 'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये नायिकेच्या नावार दिर्घकाळापासून विचार करण्यात येत होता. परंतु आता सिनेमामध्ये मुख्य अभिनेत्रीची निवड झाली आहे. किर्तीने बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफसोबत 'हीरोपंत' सिनेमातून पदार्पण केले होते. सिनेमामध्ये अद्याप नायकाचे नाव निश्चित नाहीये.
या कादंबरीत मुलगी रिया आणि बिहारी मुलगा माधवची कहानी मांडण्यात आली आहे. माधवचा रियावर जिव जडतो आणि तिला
आपल्या आयुष्यात आणण्याची त्याला इच्छा असते. परंतु त्याला रिया नकार देते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...