आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KRKने आधी केली शिवीगाळ आता म्हणतो, 'कपिल करतोय धमकीचे फोन!'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केआरके आणि कपिल शर्मा
मुंबई: विनोदवीर कपिल शर्मा आणि कमाल रशिद खान (केआरके) यांच्यामध्ये टि्वटर युध्द संपुष्टात येणे कठिण असल्याचे संकेत दिसत आहे. केआरकेने कपिलवर धमकिचे फोन केल्याचे आरोप लावून प्रकरण आणखी चिघळले आहे. 'देशद्रोही' फेम अभिनेता केआरके ने टि्वट करून लिहिले, की त्याला धमकिचे फोन कॉल्स येत आहेत. त्याने टि्वटर पोस्टवर धमकिचे फोन कॉल्स येणारा तो नंबरही शेअर केला आहे. केआकरे एका टि्वटमध्ये कपिलच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितेल.
केआरकेने एक पोस्ट एक नंबर शेअर करून लिहिले, 'एक व्यक्ती मला फोन करून म्हणतोय, की तो डॉन असून कपिल शर्माने त्याला माझी सुपारी दिली आहे. मी मिका भाईला शब्द दिला आहे, की मी कपिल शर्माला काहीच म्हणणार नाहीये. मात्र मी धमकिच्या फोन कॉल्सची तक्रार नक्की करणार.' नेहमी वादग्रस्त टिका करून चर्चेत राहणा-या केआरकेने असेही टि्वट केले, 'चला आता हा वाद कायमचा संपवू. उद्या मी माझ्या शत्रुंची लोखंडवाला सर्किलमध्ये 2 वाजता वाट बघतो. कृपया यावे आणि माझ्यासह कॉफी घ्यावी.'
बुधवारी (2 जुलै) कपिल शर्मा आणि कमाल खानच्या भांडणाला सुरूवात केआरकेच्या एका टि्वटने झाली आहे. त्याने टि्वटमध्ये लिहिले आहे, 'जेव्हा YRFने नर्गिस फाखरीला विचारले, की ती कपिल शर्मासह सिनेमात काम करेल का? तिने स्मितहस्य देऊन सांगितले, की तिच्याकडे तारिख नाहीये.'

एवढेच नाही तर, केआरकेने पुढे लिहिले, 'नर्गिसचा एक एसएसएम- जेव्हा YRFने मला कपिलसह काम करण्याची ऑफर दिली तेव्हा मी अचंबित झाले. कदाचित तो विसरला आहे, की मला रणबीरसह लाँच करण्यात आले आहे.'

केआरकेचे हे टि्वट वाचून कपिलने आपले मौन सोडले आणि म्हणाला, 'कमाल आर खानमध्ये जर हिम्मत असेल तर मला फोन करावा. मी तुला दाखवून देईल एका पंजाबीसोबत डील करणे काय असते.' जेव्हा कपिलच्या अकाउंटवर हे टि्वट दिसत नव्हते तेव्हा कमालने लिहिले, 'कपिल मी खरंच घाबरलो. विश्वास ठेव, माझा अजूनही थरकाप उडत आहे.'

या भांडणाला संपुष्टात आणण्यासाठी कपिलने अखेर टि्वट केले, 'तुझ्यासाठी माझे हे शेवटचे टि्वट आहे... जर प्रसिध्द व्हायचे असेल तर स्वत:च्या बळावर काहीतरी कर...माझ्या नावाचा आधार नको घेऊ...' हे शेवटचे टि्वट करून कपिलने यासंबंधित इतर टि्वट डिलीट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांच्या माध्यामातून पाहा केआरके कपिलला टि्वट करून काय-काय म्हणाला...