आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumari Gnangubai Non Matrick Marathi Film Released On 27th Sept.

'स्टंट्स करताना मी डमी वापरत नाही', गंगुबाई अर्थात निर्मिती सावंतचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - स्टंट्स माझे मी करते, स्टंट्सला मी डमी वापरत नाही, अर्थात नऊ वारी साडीत स्टंट्स करणं अवघड जातं पण करते मी स्टंट्स. हे उद्गार आहेत, 'कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक' या सिनेमाच्या नायिका अर्थातच अभिनेत्री निर्मिती सावंत यांचे.

निर्मिती ताईंनी येत्या 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाच्याच्या चित्रीकरणाच्या समयीचा एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, 'नऊवारी साडी नेसून आमदाराच्या पोराला बदडून काढायचे असा प्रसंग होता. त्यात त्याच्या छाताडावर लाथ मारायची, आता नऊवारीचे काय होईल, मी थोडीसी साशंक होतेच. पण अखेर शॉट रेडी होण्यापूर्वी 100 पिना साडीला लावल्या, शॉट रेडी होताच, दे दणादण… हा सीन अगदी वन टेक पार पडला. असे अनेक प्रसंग माझ्या वर वेळोवेळी आले पण मी कधी डमीचा वापर केला नाही आणि माझ्या साईजची डमी मिळणार तरी कुठे? (हसून) दिग्दर्शकाला मी टेन्शन देत नाही.''

हा सिनेमा पाहताना कोणीही सुरुवात चुकवू नका. यामध्ये स्टंट्स करायचे म्हणून मी ते केलेले नाहीत तर त्यामागे एक संताप आहे तो व्यक्त करणारा विचार आहे, असंही निर्मिती ताई म्हणाल्या.

पुढे वाचा... गंगुबाई मालिका का बंद पडली हे गूढच, निर्माता-दिग्दर्शक आणि नायिका अजूनही संभ्रमात