नवी दिल्ली- दिल्लीमध्ये शनिवारी (11 एप्रिल)
अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन आणि कुणाल कपूर यांच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमात
अमिताभ बच्चन, जया, अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीय दिसले. नैनाचे आई-वडील रामोला आणि अजिताभ यांनी ही डिनर पार्टी आयोजित केली होती. आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानच्या इव्हेंट कंपनीला देण्यात आली होती.
कुणाल-नैनाचे लग्न 9 फेब्रुवारी रोजी खासगी समारंभ साऊथ आफ्रिकेच्या सेशेल्समध्ये पार पडले. यामध्ये कुटुंबातील काही सदस्यच उपस्थित होते. मॉडेल आणि अभिनेता कुणाल कपूर 'रंग दे बसंती'सारख्या सुपरहिट सिनेमांत झळकलेला आहे. नैना बच्चन एक इन्व्हेस्टर बँकर आहे.
कॉमन फ्रेंडकडून झाली होती कुणालची ओळख-
कुणाल आणि नैनाची भेट एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने झाली होती. काही भेटीगाठीनंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कुणालने एकदा सांगितले होते, 'नैना आणि मी एकत्र खूप समाधानी आणि आनंदी आहोत. आमचे नाते असेच पुढेही राहिल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रिसेप्शनची आणि पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...