बॉबी देओल आणि संजय दत्तला घेऊन संगीत सिवानने ‘जब जब फूल मिले’ या कॉमेडी सिनेमाची निर्मिती करण्याचे नियोजन केले होते. मात्र, बॉबीचे अपयश आणि संजयच्या आयुष्यात आलेल्या अडचणींमुळे सिनेमाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. आता सिनेमावरती काम सुरू करण्यात येणार असल्याचे कळते आहे. वास्तविक, सिनेमातील कथेमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी दोन प्रमुख कलावंत होते, त्या ठिकाणी ती संख्या वाढवून ती तीन करण्यात आली आहे. यामध्ये संजयची भूमिका कुणाल खेमू, तर बॉबीची भूमिका कार्तिक आर्यन साकारणार आहे.
तिसर्या प्रमुख भूमिकेसाठी संगीत सिवानने अर्शद वारसीला प्रस्ताव पाठवला होता. सुरुवातीला अर्शदने ही भूमिका करण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती, मात्र त्यानंतर अचानकपणे त्याने सिनेमा करण्यास नकार दिला. आता तिसर्या भूमिकेसाठी सिवान लवकरच नवीन नावाची घोषणा करणार आहे. ऑगस्टमध्ये सिनेमाचे शुटिंग सुरू होण्याचे प्रस्तावित असून 40 दिवसांचे शुटिंग मॉरिशसमध्ये होणार आहे.