आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युझिक व्हिडिओत दिसणार गौहर खान-कुशल टंडन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुशल टंडन आणि गौहर खान लवकरच दुबईत एक म्युझिक व्हिडिओ शूट करणार आहेत. हा एक रोमँटिक सुफी साँग व्हिडिओ असून तो राहत फतेह अली खान यांनी गायला आहे. या व्हिडिओचे उद्घाटन अमेरिकेत होणार्‍या आयफा अवॉर्ड्स सोहळ्यात होणार आहे. गौहर आणि कुशल या गाण्याच्या शूटिंगसाठी दुबईला गेले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन राहुल सूद करणार आहेत.
कुशल म्हणतो की, 'मला सध्या खूप ऑफर्स मिळत आहेत. मात्र, शस्त्रक्रियेमुळे मी कोणालाच होकार देऊ शकत नव्हतो. या गाण्याची संकल्पना मला खूप आवडली होती. शिवाय आनंदाची बाब म्हणजे यामध्ये मी आणि गौहर एकत्र आहोत. खरे तर ब्रेकअपनंतर दुसर्‍या व्यक्तीचा आदर करणार्‍यासाठी हे गाणे आहे.' या गाण्यासाठी मला खरे खरोखरचे जोडपे हवे होते. वास्तविक, माझे आणि गौहरचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळेच आमची या गाण्यासाठी निवड झाली. या गाण्यामध्ये नृत्य किंवा अँक्शन नसून फक्त दोघांमध्ये भरपूर केमिस्ट्री आहे.'
कुशल दोन दिवसांत गाण्याची शूटिंग पूर्ण करून 23 एप्रिल रोजी होणार्‍या आपल्या खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी मायदेशी परतणार आहेत. या गाण्याचे उद्घाटनदेखील याच दिवशी होणार आहे.