आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिच्चर भारी, गल्ला भारी, च्या मायला सगळंच 'लय भारी'; 3 आठवड्यांत 31.14 कोटींची कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रितेश देशमुख स्टारर 'लय भारी' सिनेमाचे पोस्टर)

रितेश देशमुख स्टारर 'लय भारी' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या सिनेमाच्या कमाईचा आकडा बघता हे आपल्या लक्षात येईल. या सिनेमाने तीन आठवड्यांत तब्बल 31.14 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने 'दुनियादारी'चा रेकॉर्ड मोडित काढला असून आता रवी जाधवांच्या 'टाइमपास'चा रेकॉर्ड मोडित काढण्याच्या तयारीत आहे.
'लय भारी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवसात 3.10 कोटींची विक्रमी कमाई केली होती. सिनेमंत्र, मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला 'लय भारी' हा सिनेमा पहिल्यांदाच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून दाखवण्यात आला. मराठीत पहिल्यांदाच या सिनेमाचे दिवसाला 1500 शो दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवावी लागली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या यापूर्वी कोणत्या मराठी सिनेमांनी कोणत्या मराठी सिनेमांचे रेकॉर्ड मोडित काढले...