आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लारा-महेश कन्‍येचे नाव आहे 'साईरा'!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी विश्‍वसुंदरी लारा दत्ता हीने काल कन्‍यारत्‍नाला जन्‍म दिला. या कन्‍येचे नामकरणही झाले आहे. तिचे 'साईरा' असे नाव ठेवण्‍यात आले आहे. गेल्‍या फेब्रुवारीमध्‍ये लारा दत्‍ता ही टेनिसपटू महेश भूपतिसोबत विवाहबद्ध झाली होती. लारा-महेशच्‍या जीवनात आलेली ही छोटी परी महेशसाठी निश्चितच लकी ठरली आहे. ऑस्‍ट्रेलियन ओपन टेनिस सपर्धेमध्‍ये त्‍याने कालचा जिंकला. माझ्या घरी मुलगीच जन्‍माला यावी, अशी मी प्रार्थना करीत होतो. इश्‍वराने माझी इच्‍छा पूर्ण केली, असे भूपतिने एका मुलाखतीमध्‍ये सांगितले.