आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: जेव्हा दिग्दर्शकाने रिजेक्ट केला होता गानकोकिळा लतादीदींचा आवाज, जाणून घ्या रंजक गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- लता मंगेशकर)
मुंबई: खूप कमी लोकांना माहित आहे, की गानकोकिळा लता मंगेशकरांचे वडील त्यांच्या गायनाच्या विरोधात होते. एवढेच नव्हे, एकदा त्यांनी सिनेमातून लता दीदींचे गाणे डिलीट केले होते. लता दीदींनी फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदा 1942मध्ये 'किती हसाल' सिनेमातील एका मराठी गाण्याला त्यांनी आवाज दिला होता. लता दीदींच्या वडिलांना कधीच वाटले नाही, की आपल्या मुलीने सिनेमात गाणी म्हणून नये. त्यांच्या आयुष्यात एक वाईट घडनासुध्दा आहे.
सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक एस. मुखर्जी यांनी लता दीदींच्या आवाजाला फेटाळून लावले होते. त्यांना सिनेमात गाण्यास नकार दिला होता. लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी...
इंदोरमध्ये झाला जन्म-
28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लता दीदी महाराष्ट्रात लहानच्या मोठ्या झाल्या. त्यांनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्या जेवढ्या कुशल गायिका आहेत, तेवढ्याच थिएटर अर्टिस्टसुध्दा आहेत. वयाच्या 5व्या वर्षी त्या थिएटरशी जोडल्या होत्या.
सिनेमात साकारल्या छोट्या छोट्या भूमिका
लता मंगेशकर यांचे वडील शास्त्रीय संगीताचे मोठे चाहते होते. कदातिच या कारणाने त्यांनी लता दीदींना सिनेमात गाण्यास परवानगी दिली नाही. 1942मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती ढासळली. लता दीदींनी घर सांभाळण्यासाठी थिएटरमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिग्दर्शक एस. मुखर्जी यांनी रिजेक्ट केला होता लता दीदींना सु-मधुर आवाज...