आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Producer Smita Thackereys Son Rahul Thackeray Marries Aditi Redkar

बाळासाहेबांचा नातू, स्मिता ठाकरेंचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत अडकला लग्नगाठीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रे - स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुलच्या लग्नातील खास क्षणचित्रे)
मुंबईः शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे सोमवारी लग्नगाठीत अडकला. राहुलने त्याची गर्लफ्रेंड अदिती रेडेकरसोबत लग्न केले. वांद्रे येथील एमसीए लॉनवर नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत थाटात त्यांचे लग्न पार पडले. या लग्नात ठाकरे कुटुंबीयांसोबत बॉलिवूड स्टार्स आणि राजकारणातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
या लग्नात मनसे अध्यक्ष आणि राहुलचे काका राज ठाकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेसुद्धा पत्नी आणि मुलासोबत लग्नात सहभागी झाले होते.
राहुल अभिनेता आणि निर्मातासुद्धा आहे. त्याने 'राडा रॉक्स' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राहुल आणि अदितीच्या लग्नाची खास छायाचित्रे...