आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Late Mansur Ali Khan Pataudi And Sharmila Tagore's Love Story

शर्मिला यांना बिकिनी परिधान करण्यास नव्हती अडचण, जाणून घ्या कसे जिंकले नवाबचे मन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फिल्मफेअरसाठी शर्मिला यांनी केलेले बिकिनी फोटोशूट आणि नवाब मंसूर अली खान पटौदीसोबत शर्मिला)
मुंबई- 60-70च्या दशकात एकापाठोपाठ एक शानदार सिनेमे देणा-या बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर आज 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'कश्मीर की कली' (1964), 'वक्त' (1965), 'आराधना' (1969), 'अमर प्रेम' (1972), 'ऐन इवनिंग इन पॅरिस' (1967), 'चुपके चुपके' (1975) आणि 'मौसम' (1975)सारखे हिट सिनेमे देणा-या शर्मिला यांनी आपला लाइफ पार्टनर म्हणून प्रसिध्द क्रिकेटर आणि भारतीय टीमचे कॅप्टन नवाब मंसूर अली खान पटौदी यांची निवड केली.
शर्मिला टागोर भारतीय सिनेमाच्या प्रसिध्द आणि आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या एका हिंदू बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील गितेंद्रानाथ टागोर 'टागोर एल्गिन मिल्स'च्या ब्रिटीश इंडिया कंपनीचे व्यवस्थापक होते. 1959मध्ये सत्यजीत रे यांच्या 'अपूर संसार' या बंगाली सिनेमातून त्यांनी फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या शर्मिला यांनी 60च्या दशकात बिकिनी परिधान करून लोकांना तोंडात बोट घालायला लावले होते. आज अनेक अभिनेत्री बिकिनी आणि स्विमसूट परिधान करून प्रेक्षकांना भूरळ घालण्याचा प्रयत्न करतात, मात्र याची सुरुवात शर्मिला यांनी केली होती.
पटौदी यांच्याशी शर्मिला टागोर यांची भेट पहिल्यांदा कोलकाता येथे झाली होती. पटौदी तेथे मित्रासोबत एका कार्यक्रमात गेले होते. तिथे शर्मिलाला पाहून ते त्यांचा प्रेमात पडले होते. शर्मिलासुध्दा त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढत गेल्या. 1 मार्च 1967मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि 27 डिसेंबर 1969 रोजी बाल्व डेर स्टेट कोलकातामध्ये त्यांचे लग्न झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा शर्मिला आणि मंसूर अली खान पटौदी यांच्या प्रेमाची रंजक कथा...