आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिर खानच्या 'पीके'चे शूटिंग अजून बाकी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - आमिर खानच्या 'पीके'चे पोस्टर)

आमिर खानने आपल्या 'पीके'चे प्रमोशन अशापद्धतीने सुरू केले जणू चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आतापर्यंत आमिरने कल्पकतेने 'पीके'चे दोन पोस्टर सार्वजनिक केले आहेत. यातून आमिर ‌खानला जे काही साध्य करायचे होते, ते त्याने केव्हाच मिळवले आहे.
मात्र, या चित्रपटाची पूर्ण शूटिंग अजून झालेली नाही. आमिर आणि अन्य कलावंत 'पीके'चे 20 दिवसांचे बाकी असलेले शेड्यूल लवकर चित्रित करणार आहेत. हे शूटिंग पनवेल आणि मुंबईच्या बाहेर काही महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या शूटिंगसाठी आमिर आपला संपूर्ण वेळ देणार आहे. तर अनुष्का शर्मा केवळ एका गाण्याच्या शूटिंगसाठी या शेड्यूलमध्ये सहभागी होणार आहे. शूटिंगदरम्यान आमिरचे वजन वाढल्याने 20 दिवसांचे शूटिंग शिल्लक राहिले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पीके'च्या शूटिंग सेटवरील काही निवडक छायाचित्रे..