आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात आमिरला शूटिंगसाठी करण्यात आला मज्जाव, भरावा लागला दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः आमिर खान)
नाशिक: अभिनेता आमिर खानच्या आगामी 'पीके' सिनेमाच्या शूटिंगमध्ये थोड्या वेळासाठी व्यत्यय आला होता. नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिर परिसरात शूटिंग करण्यास त्याला मनाई करण्यात आली होती. मात्र दंडाची रक्कम भरल्यानंतर त्याला शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे, की काळाराम मंदिर हे नाशकातले एक ऐतिहासिक मंदिर आहे. याठिकाणी कोणत्याही सिनेमाचे किंवा मालिकेचे शूटिंग करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र आमिर खानने विनापरवाना शूटिंग सुरु केल्याने मंदिर प्रशासन आक्रमक झाले होते. आमिर खानच्या 'पीके' सिनेमात काही दृश्यांचा समावेश करण्यासाठी काळाराम मंदिर आणि रामकुंड परिसरात शूटिंग सुरु होते. त्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती. मात्र मंदिर प्रशासनाची परवानही न घेतल्याने सुरुवातीला चित्रिकरणाला विरोध करण्यात आला. पण दंडाची 25 हजाराची रक्कम भरल्यानंतर काळाराम मंदिर परिसरात शूटिंग करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली असून शूटिंगला सुरुवात झाली आहे.