अजय देवगण अभिनीत ‘अॅक्शन जॅक्सन’च्या निर्मितीमध्ये एक वर्षात अनेक अडथळे आले आहेत. याची शूटिंग जवळपास पूर्ण झाली असून सध्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. ‘
सिंघम रिटर्न्स’ला मिळालेल्या अपेक्षित यशानंतर अजय ‘अॅक्शन जॅक्सन’ सर्वोत्तम बनवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करत आहे. सिनेमाच्या प्रमोशनबाबत त्याने आतापासूनच धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. ‘
सिंघम रिटर्न्स’चा पहिला प्रोमो ३५ दिवस अगोदर रिलीज करण्यात आला होता. सूत्रानुसार, ‘अॅक्शन जॅक्सन’चे निर्माते नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणा-या
आपल्या सिनेमाचा ट्रेलर ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ऋतिक अभिनीत ‘बँग बँग’सोबत लाँच करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, दोन्ही सिनेमांचे स्टुडिओ वेगवेगळे असल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे.
फॉक्स स्टार ‘बँग बँग’चा निर्माता स्टुडिओ आहे, तर गोवर्धन तनवानी निर्मित ‘अॅक्शन जॅक्सन’चा इरॉस इंटरनॅशनल विश्व वितरक आहे. हे दोन्हीही स्पर्धक स्टुडिओ असल्याने ऋतिकच्या सिनेमासोबत ट्रेलर लाँच करण्यास निर्मात्यांना अडचणी येत आहेत. हा पेच सोडवण्यासाठी आता स्वत: अजयनेच पुढाकार घेतला आहे. अजयच्या सिनेमांचे सॅटेलाइट अधिकार स्टार प्लसने खरेदी केले आहेत. पुढच्या पाच वर्षांपर्यंत अजय अभिनीत निर्मित सिनेमा टीव्हीवर दाखवण्याचे अधिकार स्टारकडे आहेत. फॉक्स स्टार आणि स्टार जुळ्या कंपन्या आहेत. सूत्रानुसार, अजय आपल्या या कराराचा आधार घेत फॉक्स स्टारकडून आपल्या सिनेमाचा ट्रेलर ‘बँग बँग’सोबत लाँच करण्याची परवानगी घेणार आहे.