आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Marathi Film Salaam Promotional Song

\'सलाम\'मधील प्रमोशनल साँगसाठी 30 गायकांनी चढवला स्वरसाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ता-यांचे बेट' या सिनेमानंतर दिग्दर्शक किरण यज्ञोपवित सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येत आहेत 'सलाम' हा सिनेमा. गिरीश कुलकर्णी आणि बालकलाकार विवेक चाबूकस्वार या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या सिनेमासाठी एक खास प्रमोशनल साँग तयार करण्यात आले आहे.
आपलं छोटं आयुष्य मोठं करणा-या प्रत्येकाला सलाम ही टॅगलाईन असलेल्या या सिनेमासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 30 पार्श्वगायक-गायिकांनी एकत्र येत एक समूह गीत सादर केलं आहे. ''त्या दृष्टीला सलाम, त्या वृत्तीला सलाम, त्या जगण्याला सलाम...'' असे भावपूर्ण शब्द असणा-या या गीताची रचना वैभव जोशी यांनी केली असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे संगीतकार नरेंद्र भिडे यांनी हे समूह गीत संगीतबद्ध केलं आहे. टाळ, पखवाज, चंडा, तबला यांसारख्या पारंपरिक वाद्याला गिटारसारख्या आधुनिक वाद्याची जोड देऊन हे गीत तयार करण्यात आले आहे. या गीताला सिनेरसिकांची नक्की दाद मिळेल असा विश्वास सिनेमाच्या टीमने व्यक्त केल आहे.
गिरीश कुलकर्णी आणि विवेक चाबूकस्वार यांच्यासह किशोर कदम, अतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे, हृषीकेश जोशी, सिद्धेश्वर झाडबुके, सुहास शिरसाट यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. आपल्या आवडत्या माणसाविषयी असणा-या भन्नाट कल्पना आणि जगण्याच्या प्रत्येक टप्प्यांवर शहाणपण प्रदान करणारे अनुभव या संकल्पनांवर भाष्य करत निखळ मनोरंजनाचा आनंद देमारा सलमान हा सिनेमा येत्या 2 मे रोजी हा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा 'सलाम' या सिनेमाची खास झलक आणि जाणून घ्या सिनेमाविषयी अधिक...