आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्येच प्रियांकाचा \'मेरी कोम\' अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मेरी कोम सिनेमातील एका )

प्रियांका चोप्रा अभिनीत 'मेरी कोम' रिलीज होण्यास केवळ एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे. चित्रपट संपूर्ण देशामध्ये रिलीज होत आहे, पण ऑलिम्पिक चॅम्पियन मेरीचे मूळ राज्य मणिपूरमध्ये या चित्रपटाच्या रिलीजवर निर्बंध लादण्यात आले आहेत. सूत्रानुसार, वायाकॉम मोशन पिक्चर्स ही चित्रपट निर्माता कंपनी आणि दिग्दर्शक उमंग कुमार बऱ्याच दिवसांपासून मणिपूर सरकारशी या विषयावर चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी वायाकॉम मोशन पिक्चर्सने याबाबत तेथील सरकारला एक पत्र लिहिले आहे. स्थानिक पातळीवरदेखील चित्रपट रिलीज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे, १५ वर्षांपासून मणिपूरमध्ये हिंदी चित्रपटाच्या रिलीजवर निर्बंध लादण्यात आले आहेत. स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्या रेव्होल्यूशनरी पीपल्स फ्रंटने हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोवरदेखील बंदी घातली होती. यावर स्वत: मेरीने स्थानिक सरकारशी चर्चा करण्याचे संकेत दिले होते. उमंग कुमार यांनी 'भाग मिल्खा भाग'पूर्वी आपण मेरीच्या कथेवर काम सुरु केले होते, असे सांगितले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मेरी कोम गरोदर असल्याने सेटवर उपस्थित राहू शकत नव्हती. मात्र, व्हिडिओ कॉलद्वारे तिने प्रियांका चोप्राला अनेक शब्दांचे मणिपुरी उच्चारण आणि आपली शैली शिकवली.
या चित्रपटात दर्शन कुमारने मेरीच्या पतीची भूमिका साकारली आहे. दर्शननेदेखील मेरीचे पती ओनलर कॉमचे अनेक व्हिडिओ पाहून पती-पत्नींमधील प्रेम आणि मैत्री समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपट व्यापक पातळीवर प्रदर्शित व्हावा, जेणेकरून मेरीचा संघर्ष सर्वांसमोर येईल आणि तो प्रेरणादायी ठरेल, अशी प्रियांका चोप्राची इच्छा आहे. दरम्यान मणिपूरच्या मुलीच्या आयुष्यावरील कथेला मोठ्या कॅन्व्हासवर आणणाऱ्या निर्माता कंपनीने चित्रपटाच्या नफ्यातील भाग मेरी कोम फाउंडेशनला देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मेरीचे मूळ राज्य मणिपूरमध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता मावळल्याने निर्मात्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. शिवाय स्थानिक पातळीवर चित्रपट रिलीज करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'मेरी कोम' सिनेमातील निवडक छायाचित्रे...