आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकागोमध्ये होणार नवाजुद्दीन सिद्दिकीचा गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात उल्लेखनीयकामगिरी केल्याबद्दल अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा गौरव करण्यात येणार आहे. शिकागोमध्ये साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये १६ सप्टेंबरला नवाजुद्दीनला पुरस्कार देण्यात येईल. पुरस्कार स्वीकारल्यानंतर नवाज लॉस एंजलिस, न्यूयॉर्क आणि वॉशिग्टनला देखील जाणार आहे. पुरस्कार मिळण्याच्या वृत्ताने नवाज उत्साहित झाला मात्र, सध्या आपल्या घरामध्ये ट्रॉफी ठेवायला जागा नसल्याचे नवाजने मिश्कीलपणे सांगितले आहे.
नवाज म्हणतो की ,‘ मला आनंद वाटला. पुरस्काराची मला किंमत वाटत नाही, असे नाही. खरं तर मुंबईमधील माझ्या घरामध्ये सध्या ट्रॉफी ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे या ट्रॉफी मी उत्तर प्रदेशातील बुदाना या गावातील घरामध्ये ठेवण्यास पाठवणार आहे.’
कधीच डिझायनर कपडे घालणाऱ्या नवाजने आपल्या ड्रेसकोडबद्दल सांगितले की, आता मला मोठ्या डिझायनर्सद्वारा प्रस्ताव येत आहेत. पण मी त्यांना नकार देत आहे. मला डिझायनर्सद्वारे तयार झालेले कपडे घालण्यास संकोच वाटतो. त्यामुळे आजही माझी रेडिमेड सूट आणि कपड्यांना पसंती आहे.