आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधून निघाली सोनमची 'डॉली की डोली'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरबाज खानच्या बॅनरचा 'डॉली की डोली' चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग नाशिकमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. या वेळी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असलेल्या सोनम कपूरवर काही महत्त्वपूर्ण दृश्ये चित्रित करण्यात आली. दिग्दर्शक अभिषेक डोगराने रेल्वेस्टेशन आणि हवेलीची काही दृश्ये या ठिकाणी शूट केली.
चित्रपटातील सोनम कपूरच्या लूकबाबत अजून तरी गुप्तता बाळगली जात आहे. या चित्रपटात पळपुट्या नवरीची भूमिका करत असलेल्या सोनमसोबत हरियाणवी गेटअपमध्ये पुलकित सम्राट दिसणार आहे. शिवाय राजकुमार राव या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपटात सलमान खानदेखील पाहुण्याची भूमिका करण्याची शक्यता आहे. अभिषेक डोगराने यापूर्वी आर. बाल्कीला त्यांच्या अमिताभ बच्चन अभिनीत 'पा' चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये मदत केली होती.