आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Hema Malini, Shri Devi Campaign

PIX:धो-धो मतांसाठी हेमा मालिनी- श्रीदेवीचा आटापिटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह ब-याच ठिकाणी मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. गुरुवारी या ठिकाणी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षानी जोरदार प्रचार केला. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले सेलिब्रिटी मंगळवारी प्रचारादरम्यान बराच घाम गाळताना दिसले.
मथुरा येथील भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी मंगळवारी प्रचारफेरीदरम्यान हापशावर पाणी काढून पाहिले. लोकसभा निवडणुकीत धो-धो मते मिळवण्यासाठी त्यांनी हा आटापिटा केला खरा. आता जनता त्यांना धो-धो मते देणार की पाणी पाजणार, हे निकालाच्या दिवशीच कळेल.
तर अमर सिंह यांच्यासाठी श्रीदेवी आणि तिचे पती बोनी कपूर फतेहपूर सीकरीतील रालोदा येथे रोड शो करताना दिसले. गुल पनाग आणि किरण खेर याही प्रचारात मागे नव्हत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हेमा मालिनी, श्रीदेवी आणि गुल पनागसह सेलिब्रिटींचे निवडणुकीचे रंग...