आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Hindi 'Mary Kom' Goes Tax Free In State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंड-राजस्थानमध्ये करमुक्त झाला MERY KOM, थरूर आणि जिंदल यांनी केली प्रशंसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- सिनेमाचे पोस्टर
नवी दिल्ली- ऑलम्पिक विजेती बॉक्सर मेरी कोमच्या जीवनपटावर बेतलेला 'मेरी कोम' हा सिनेमा रिलीजपूर्वीच अनेक राज्यांमध्ये करमुक्त झाला आहे. झारखंड आणि राजस्थान या राज्यातसुध्दा हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. 'मेरी कोम' सिनेमा संदेश देणारा असून लोकांनी सिनेमा पाहिल्यास त्यातून प्रेरणा मिळू शकते असे राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सांगितले. यापूर्वी आसाम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातसुध्दा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. आज हा सिनेमा (5 सप्टेंबर) जगभरात रिलीज झाला आहे.
सिनेमात प्रियांका चोप्राने पाच वेळा विश्व विजेती ठरलेली मेरी कोमची भूमिका साकारली आहे. सिनेमा उमंग कुमार यांनी दिग्दर्शित केला असून व्हायकॉम 18 पिक्चर्स-संजय लीला भन्साळी यांनी निर्मित केला आहे.
खेळाडू आणि राजकिय नेत्यांनी केली सिनेमाची प्रशंसा
प्रियांकाने सांगितले, 'हा सिनेमा एक सक्षम महिलेची कहानी सांगणारा आहे. तिने मजबूत विचारांनी देशाचे नाव उंचावले आहे. ज्या खेळाडूंनी जगभरात देशाचे उंचावले आहे त्यांना हा सिनेमा समर्पित आहे. त्यांना हा सिनेमा पाहून समाधान आणि आणखी जास्त प्रोत्साहन मिळाले तर आम्ही यशस्वी झालो.' ओमंग कुमार या सिनेमातून पदार्पण करत आहे. सिनेमाने रिलीज होण्यापूर्वी बरीच लोकप्रियता मिळावली आहे. खेळाडू आणि राजकिय नेत्यांनी सिनेमाची प्रशंसा करत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत...
- बॅडमिंटन सायना नेहवाल म्हणाली, 'मेरी कोम हा सिनेमा एका भावनात्मक प्रवासासारखा आहे. एक खेळाडू म्हणून मी या सिनेमाला चांगल्या प्रकारे समजू शकले.'
- भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार संदीप सिंहच्या मते, 'मेरीचे आयुष्य दाखवणारा हा सिनेमा मनाला भिडणारा आहे. तिचे जीवन प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा देणारे आहे.'
- तिरंदाज दीपिका कुमारीने सांगितले, 'प्रियांका चोप्राने मेरीचे पात्र साकारून मन जिंकले. मी
सिनेमा पाहताना तिचा राग, संघर्ष आणि आनंद तिन्ही अनुभवले.'
- नेमबाज रंजन सोढी म्हणाला, 'मेरी कोमचे जीवन रुपेरी पडद्यावर दाखवणे खूपच शानदार राहिले आहे. प्रियांकाचे नाव सिनेमाचा आत्मा आहे.'
काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी सांगितले, 'मी बॉक्सिंगचा चाहता नाहीये. परंतु मला सिनेमा खूप आवडला. कारण त्यात एका महिले धाडस आणि खेळाप्रति समर्पणाची कहानी मांडण्यात आली आहे. प्रियांकाने मेरीचे पात्र उत्कृष्ट साकारले आहे.'
नवीन जिंदल यांनी सांगितले, 'हा खरंच एक प्रेरणादायी सिनेमा आहे.'
रेटींग
टाइम्स ऑफ इंडियाने सिनेमाला 3.5 स्टार दिले आहे.
हेडलाइन्स टुडेने 2.5 स्टार दिले आहे.
हिंदुस्तान टाइम्सने सिनेमाला 2.5 स्टार दिले आहे.
bollywoodlife.comने सिनेमाला 4 स्टार दिले आहे.
india.comने सिनेमाला 3.5 स्टार दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातून घेण्यात आलेली काही छायाचित्रे...