आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Shahrukh Film Happy New Year Strange Promotion Way

\'हॅप्पी न्यू इअर\'च्या प्रमोशनसाठी TWITTERवर शाहरुख \'चार्ली\' तर दीपिका बनली \'मोहिनी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: शाहरुख, दीपिका, अभिषेक आणि बोमन इराणी यांचे TWITTER पेज
नवी दिल्ली: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमा हिट करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सिनेमाच्या मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेत्यांनी आपल्या ऑफिशिअल टि्वटरच्या प्रोफाइलचे नावेदेखील बदलली आहेत. शाहरुख खानने टि्वटरवर स्वत:चे नाव चार्ली, दीपिकाने मोहिनी, बोमन इराणी यांनी टॅमी आणि अभिषेक बच्चनने नंदू असे ठेवले आहे. हे सिनेमातील त्यांच्या पात्राचे नावे आहेत.
सोशल साइटवर हिट झाला ट्रेलर
सिनेमाचा ट्रेलर सोशल साइट्सवर हिट झाला आहे. फराह खानच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. ऑफिशिअल ट्रेलरची निर्माण कंपनी 'रेड चिली एन्टरटेन्मेंट'च्या पेजवर जवळपास 468,297 लोकांनी बघितले आहे. तसेच, YRF अर्थातच 'यशराज फिल्म्स'च्या पेजवर 296,683 लोकांनी हा ट्रेलर बघितला असल्याचे सांगितले जात आहे.
स्टारकास्ट
'हॅप्पी न्यू इअर' कलाकरांनीसुध्दा चर्चेत आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस'ची जोडी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहेत. 'ओम शांती ओम' सिनेमातसुध्दा दोघांची जोडी चांगलीच पसंत करण्यात आली होती. सिनेमात बोमन इराणी, अभिषेक बच्चन आणि विवान शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन आणि कॉमेडी दोन्हींची झलक पाहायला मिळत आहे. हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हॅप्पी न्यू इअर'चा ट्रेलर आणि त्या संबंधित फोटो...